Corona-Danger 
पुणे

पुणे विभागात सध्या किती आहेत कोरोनाबाधित? वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे ४३, सातारा २, सांगली २५, कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संसर्ग
पुणे - पुणे विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत आठने वाढ झाली आहे. आज (ता. ३०) एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. त्यात पुणे ४३, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली.

कोरोनाच्या संशयित एक हजार ३६५ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार २८२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी एक हजार १९३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. तसेच २२ जणांच्या नमुन्यांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. आत्तापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे.

पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात हजार ३९७ प्रवाशांपैकी चार हजार ३८१ प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी ३ हजार १६ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण झालेला आहे. म्हणजेच ३ हजार १६ व्यक्तींचा 'होम कॉरंनटाइन' कालावधी पूर्ण झाला असून, चार हजार ३८२ व्यक्ती अजूनही कॉरंनटाइनमध्ये आहेत.

पुणे विभागातील स्थिती
-अन्न व औषध प्रशासनाकडून 'एन ९५' मास्क : २८ हजार ५८९
-'२ प्लाय' आणि '३प्लाय' मास्क उपलब्ध : २ लाख ९ हजार २४
-भाजीपाला आवक : १२ हजार ९८४ क्विंटल
-दूध संकलन : ८९ लाख ८८ हजार लिटर

'पीएमपी'ची सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) रविवारी    (ता. २९) एकूण २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी १९ हजार ९९३ फेऱ्या रद्द केल्या होत्या. १ हजार ६१० फेऱ्यांमध्ये एकूण ५ हजार १६१ प्रवाशांनी प्रवास केला. सद्यस्थितीत अत्यावश्यक बाबींसाठी फेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT