CoronaVirus 
पुणे

पुण्यात आतापर्यंत किती लोक झाले कोरोनामुक्त; काय सांगतात आकडे वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात शनिवारी (ता. ६) पावणेतीनशे रुग्णांची भर पडली; तर २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने या आजारापासून बरे झालेल्यांचा आकडा पाच हजारांच्या घरात पोचला आहे. तर, सध्या २ हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, नव्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५७ झाली आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध रुग्णालयांतील १९५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतांमध्ये ४५ ते ५० पेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. त्यांना अन्यही आजार आहेत. दिवसभरात १ हजार ६४९ जणांची तपासणी झाली आहे. मृतांत दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. 

शहरात आतापर्यंत ५८ हजार ४५५ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ७ हजार ७२२ रुग्णांना कोरोना झाला असून, ३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या २ हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

पुण्यात दिवसभरात

  • कोरोनामुक्त २५९
  • संसर्ग २७५
  • मृत्यू ६
  • एकूण रुग्ण ७,७२२
  • एकूण मृत्यू ३५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT