Murlidhar Mohol sakal
पुणे

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांच्याकडे किती आहे संपत्ती?

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती किती? आकडे आले समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपये असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोहोळ यांच्यावर १४ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज आहे.

मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. स्वतः मोहोळ, त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावाने एकूण जंगम मालमत्ता ५ कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ रुपये इतकी आहे. यामध्ये मोहोळ यांच्या केवळ ९ हजार १९२ रुपयांची रोख आहे. तर पत्नीच्या हातात १ लाख २१ हजार १२४ रुपये रोख आहे.

मोहोळ यांच्या नावाने बँकेमध्ये ६६ लाख ७४ हजार २०७ रुपयांची ठेवी आहेत, पत्नीच्या नावाने २ लाख ७१ हजार २७३ तर दोन मुलींच्या नावाने प्रत्येकी अनुक्रमे ४९ हजार ९८१, १०६८९ रुपये इतक्या रुपयांच्या ठेवी आहेत.

मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता १९ कोटी ५ लाख ६७ हजार ६९५ इतकी आहे. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील मुठा गावात ३६ गुंठे, कासार आंबोळी येथे २७ गुंठे, भूगाव येथे १४ गुंठे जमीन आहे. तर वाई तालुक्यातील येरुली गावात ३.१८ एकर जमीन आहे.

पुणे शहरात कोथरूड येथे एक ५ हजार २४५ चौरस फुटाचा बंगला असून त्याची किंमत ५ कोटी ४७ लाख ८१ हजार ११४ इतकी आहे. तर ४५० चौरस फुटाच्या फ्लॅटची किंमत ३४ लाख ४० हजार इतकी आहे. मोहोळ यांच्या कुटुंबाकडे ४१ तोळे सोन्याचे दागिने आहेत.

तर २२ लाख १४ हजार ३८२ रुपयांचे एकच वाहन आहे.

सोने - २९.४५ लाख

स्थावर मालमत्ता -१९.०५ कोटी

बॅंकेतील ठेवी - ६६.७४ लाख

कर्ज - १४.८५ कोटी

वाहने - २२.१४ लाख

शेअर्स - ३.९६ कोटी

एकूण - २४.३२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT