How to take care of your pet during lockdown.jpg
How to take care of your pet during lockdown.jpg 
पुणे

Lockdown : आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घ्या पण....

सुवर्णा नवले

पिंपरी : 'बाळाचे बोबडे बोल ज्याप्रमाणे मातेला समजतात तशी पाळीव प्राण्यांची भाषा प्राणी प्रेमींनाच समजते. मनुष्याप्रमाणेच त्यांचेही हट्ट, भावनांचा आदर, भटकंती, व्यायाम, खाणं-पिणं हे नित्यनियमाने सुरळीत होत नसल्याने राग अनावर होऊन प्राण्यांचा चिडचिडेपणा वाढला आहे. पाळीव प्राण्यांचा दिनक्रम सध्या लॉकडाउनमध्ये पूर्णत: बिघडला आहे. उपचाराअभावी त्यांचे हाल होत आहेत. त्यातच श्‍वानांना फिरायला नेल्यास पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे श्‍वानप्रेमींना वेळप्रसंगी पोलिसांच्या काठ्यांचा प्रसादही मिळत असल्याचे प्रसंग वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे.

 Coronavirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाखांच्या जवळ तर, मृतांचा आकडा...
पिंपरी-चिंचवड शहरात जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रीव्हर, अल्सेशिअन, रॉटवॉयलर, हस्की, पग, बीगल, लॅब्रडॉर, डॉबरमॅन, पॉमेरिअन आदी जातीचे श्‍वान पाळले जात आहेत. यातील प्रत्येक श्‍वानाच्या दिनचर्या व सवयी वेगवेळ्या आहेत. त्यामुळे या श्‍वानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्‍वानप्रेमी जमेल तसे श्‍वानांना व्यायामासाठी टेरेसवर व गॅलरीत नेत आहेत. त्यांचा व्यायाम होत नसल्याने सांधेदुखी, मधुमेहासारखे आजार बळावण्याची शक्‍यता वाढली आहे. शिवाय श्‍वानांची फिजिओथेरपी रखडली आहे. त्यातच उष्म्यातही वाढ झाल्याने अधिकच काळजी घेण्याचे आवाहन श्‍वानप्रेमींपुढे उभे ठाकले आहे. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचेय ? 'हे' आहेत पर्याय
सोसायटीत ही कुत्री सध्या जोरजोरात भुंकत असल्याने श्‍वानप्रेमी भल्या पहाटे व रात्री श्‍वानांना घेऊन गुपचूप घराबाहेर पडत आहेत. प्राण्यांना घरात नैसर्गिक विधी न करता मोकळ्या वातावरणाची सवय असल्याने अवघड होऊन बसल्याची खंत श्‍वानप्रेमींनी व्यक्त केली.

प्राण्यांपासून संसर्ग पसरतो हे पूर्णत: चुकीचे आहे. तसे वेल्फेअर ऍनिमल बोर्डकडूनही सांगण्यात आले आहे. सोसायटी अथवा परिसरात प्राण्यांना दुय्यम वागणूक देणे चुकीचे आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.

श्‍वानाचं खाणं ही झालं महाग...
श्‍वानांसाठी विविध कंपन्याचे खाद्य मिळते. मात्र, ट्रान्सपोर्टअभावी खाद्याच्या दरात चौपटीने वाढ झाली आहे. श्‍वानप्रेमींचे काही खासगी दवाखानेही बंद आहेत. त्यामुळे श्‍वानांचा सांभाळ करणे मोठे आवाहन झाले आहे.

सध्या भटक्‍या प्राण्यांचे हाल तर सुरूच आहेत. मात्र, पाळीव प्राण्यांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाउनमध्ये प्राण्यांच्या सान्निध्यात राहून त्यांना प्रेम देणे गरजेचे आहे. त्यांचे खाण-पान व व्यायाम जपणे अत्यावश्‍यक आहे. डॉक्‍टरांशी तत्काळ संपर्क होत नाही.
- टान्झिला, श्‍वानप्रेमी, रावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT