पुणे

ॲक्शन घ्यायला सांगतो! गर्दीबद्दल अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

विनायक होगाडे

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं जात आहे. आज पुण्यात वीकेंड लॉकडाऊन आहे; मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांचं पालन या ठिकाणी होताना दिसत नाहीये. अजित पवार पक्ष कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आत गेले होते. यासंदर्भात पोलिसांना कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करायला सांगणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी मंचावर बोलताना अजित पवार यांनी या गर्दी प्रकरणावर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त केली आहे. ॲक्शन घ्यायला सांगतो! असंही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, सकाळी बोललेले सभा घेणार नाही, पण मी परत गेलो असतो तर कार्यकर्तेही नाराज झाले असते. मी प्रशांतला (शहराध्यक्ष) सांगितलं होतं हा कार्यक्रम साधेपणाने करा. मात्र, मलाच अशा कार्यक्रमामध्ये बोलावलं जातं जिथं धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही, त्याबद्दल मी मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय की, अजित दादांची मनापासून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. दादा येणार म्हणून कार्यक्रत्यांनी गर्दी केली. साधेपणाने कार्यक्रम व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच प्रयत्न केला.

या कार्यक्रमाला येण्याआधी सकाळीच उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. कडक कार्यवाही करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र, खुद्द अजित दादांच्या कार्यक्रमातच हा गोंधळ पहायला मिळला आहे.

1999 नंतर मोठं पक्ष कार्यालय पहिल्यांदाच होत आहे. 22 वर्षांनंतर कार्यालय होत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. त्यामुळे समजून घ्या, दिलगिरी व्यक्त करतो, असं अंकुश काकडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

शहरात शनिवार आणि रविवारी विकेंडला कडक निर्बंध राहतील. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील बाधित रुग्ण दर कमी न झाल्यामुळे निर्बंध कायम राहतील. नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. अन्यथा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र दुसरीकडे पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ही तोबा गर्दी पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT