fire broke out furniture godown Kondhwa fire put out fire brigade
fire broke out furniture godown Kondhwa fire put out fire brigade sakal
पुणे

कोंढव्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढवा बुद्रूक येथील पारगे नगरमधील एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपुर्ण गोडाऊन आगीच्या भस्मस्थानी सापडले. हि घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

कोंढव्यातील पारगे नगर येथे फर्निचरचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरीकांना दिसले. त्यामुळे नागरीकांनी याबाबत तत्काळ अग्निशामक दलास याबाबत खबर दिली. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली.

मात्र या गोडाऊनमध्ये फर्निचरच्या वस्तु मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही वेळातच वाढली. त्यामुळे जवानांनी आगीवर पाण्याचा जोरदार मारा करुन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दोन ते अडीच तासानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळविता आले. रात्री उशीरापर्यंत जवानांकडून कुलींगचे काम सुरु होते. या आगीमध्ये संपुर्ण गोडाऊन जळून खाक झाले. दरम्यान, गोडाऊनला आग कशामुळे लागली, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT