पुणे

रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - रशियाच्या "स्पुटनिक - 5' या कोरोना प्रतिबंधक लशीच्या सुरक्षिततेची मानवी चाचणी पुण्यात पूर्ण झाली. पुण्यातील 17 स्वयंसेवकांना या अंतर्गत ही लस देण्यात आली. 

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, रशियातील गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर आँफ एपिडेमिओलॉजी अँण्ड मायक्रोबायोलॉजी, रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्यातर्फे "स्पुटनिक -5' ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात येत आहे. 

केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या अहवालानंतर रशियाच्या "स्पुटनिक -5' लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देशात सुरुवात झाली. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता यात तपासली जाते. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात लस किती सुरक्षित आहे, याची चाचणी मानवावर केली जाते. ही चाचणी पुण्यातील 17 स्वयंसेवकांवर नोबल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. 

या बद्दल नोबेल हॉस्पिटलमधील क्‍लिनिकल रिसर्चचे प्रमुख डॉ. एस. के. राऊत म्हणाले, ""स्पुटनिक-5' लशीच्या चाचणीसाठी 17 निरोगी स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. त्यांना ही लस देण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये सुरू होती. लस निर्माण करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील या मानवी चाचण्या होत्या. गेल्या शनिवारी या टप्प्यावरील लसीकरण पूर्ण झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही लस दिल्यानंतर प्रत्येक स्वयंसेवकांना कोणती रिऍक्‍शन येत आहे का, हे बारकाईने तपासण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रशियाच्या लसीची पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथेही मानवी चाचणी करण्यात येणार आहे. त्या बद्दल माहिती देताना डॉ. आशिष बावडेकर म्हणाले, या मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या वढू येथील केंद्रावर केल्या जातील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT