Manohar Bhosale
Manohar Bhosale sakal
पुणे

बदनामी करणा-यांविरुद्ध १०० कोटींचा खटला दाखल करणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काही जण माझ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागत आहेत. पैसे दिले नाही तर, तुमचा आसाराम बापू करू. त्याचे चित्र तुम्हाला दोन ते तीन दिवसात दिसेल, अशी धमकी मला दिली जात आहे. माझ्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले जात आहे. त्यामुळे बदनामी करणा-याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहाणीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती बाळूमामांचे भक्त मनोहर चंद्रकांत भोसले यांनी मंगळवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत दिली.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले यांच्याविरुद्ध भक्तांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडण केले. त्यांचे वकील रूपाली ठोंबरे-पाटील आणि ॲड. विजय ठोंबरे यावेळी उपस्थित होते.

मी कोणाचाही अवतार, बाबा किंवा महाराज नाही. मी केवळ बाळूमामांचा भक्त म्हणून त्यांची सेवा करत आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धेतून मी बाळूमामांचे मंदिर उभारले आहे. तेथे दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या गाड्या पार्क करण्यावरून काही स्थानिक लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे मी भक्तांकडून पैसे उकळतो, असा आरोप माझ्यावर होत आहेत. मात्र मी कोणत्याही व्यक्तीस एकही रुपयांची मागणी केली नाही. तेथे आलेले भक्तगण हे त्यांचे स्वच्छेने शिवसिद्ध संचालित संस्थेकडे देणगी देतात. ही देणगी केवळ मंदिर बांधकाम तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते, असे भोसले यांनी सांगितले.

माझा फोटो काढायचा की ठेवायचा हे निर्माते ठरवतील

बाळुमामा यांच्यावरील मालिकेबाबत भोसले म्हणाले, ‘बाळूमामांचे कार्य घराघरांत जावे, या हेतूने या मालिकेसाठी कथा पुरविली आहे. त्याच्या रजिस्टेशनसाठी मनोहर मामा हाय लँड एलएलपी ही कंपनी स्थापन केली आहे. त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. आता मालिकेच्या सुरवातीला दाखविला जाणारा माझा फोटो काढायचा की ठेवायचा हा निर्मात्याचा प्रश्न आहे. आमची धार्मिक वृत्ती काहींना पटली नसल्याने त्यांनी मला व भक्तांकडे खंडणी मागितली आहे. मी त्यांना खंडणी न दिल्यास ते माझ्यावर व भक्तांवर खोटेनाटे आरोप करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT