पुणे

उंडवडीत चोरट्यांच्या हल्यात पती-पत्नी गंभीर जखमी

विजय मोरे

उंडवडी : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील इंदलकर वस्तीवर अज्ञात चोरट्यानी जराड कुटूंबातील जेष्ठ पती-पत्नीसह नातवाला मारहाण करुन रोख रक्कम वीस हजार व सोन्याचे दागिने असे मिळवून सत्तर ते ऐंशी हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री अडीचच्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, उंडवडी कडेपठार हद्दीतील इंदलकर वस्ती नजिक निवृत्ती विष्णू जराड यांचे शेतात गाई गोठा व घर आहे. त्यांचा मुलगा आणि सून गावात राहतात. तर विष्णू जराड व त्यांची पत्नी व नातू हे तिघेजण जनावरांसाठी बांधलेल्या शेतातील घरी राहतात.

शुक्रवारी रात्री अडीचच्या दरम्यान येथील शेतकरी निवृत्ती विष्णू जराड (वय - 75) व त्यांच्या पत्नी रुक्मिणी जराड (वय 70) पती-पत्नी व त्यांचा नातू रोहित रवींद्र जराड (वय - 15)हे घरात गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यानी जराड यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला. व जेष्ठ पती-पत्नीसह नातवाला बेदम मारहाण करुन घरातील रोख रक्कम वीस हजार तसेच रुक्मिणी जराड यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कर्णफुले चोरुन नेली.

या घटनेत जराड यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तसेच त्यांची पत्नी आणि नातू जखमी झाला आहे. या तिघांना उपचारांसाठी बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून घटनेचा पंचनामा केला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

EV Fire: 'डिजिटल लॉक'मुळे मृत्यू झाला? EV आगीमुळे एकाच कुटुंबातील आठ जण कसे जळाले? घराबाहेरही पडता आलं नाही

नोराचं अश्लील गाणं लिहिणाऱ्या गीतकाराला चक्क मिळालाय ऑस्कर! प्रकरण अंगावर आल्यास पलटला, 'या' व्यक्तीवर फोडलं खापर!

Pune Crime News : धक्कादायक घटनेने पुणे हादरले ! समलिंगी संबंधाला विरोध केल्याने १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, संशयित तरुण ताब्यात

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीपूर्वी भाजपची बैठक

SCROLL FOR NEXT