Husband arrested for murdering wife over family dispute 
पुणे

कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; पतीला अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोहगाव येथे शुक्रवारी दुपारी एका महिलेचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली होती. दरम्यान, विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली. कौटुंबिक  वादातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संदीप भूषण लकडा (वय २१, रा. अनिरुद्ध खेसे यांची वीटभट्टी, लोहगाव) असे आर्क केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुशीला इमिल किंडो (वय २१, मूळ रा.जनकी टोली, कोखेडगा, झारखंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीला व संदीप दोघेजण पती - पत्नी असून दोघे जण मजुरी करतात.

- ...आणि तेलतुंबडे प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागली ही भूमिका
शुक्रवारी सकाळी अनिरुद्ध खेसे यांच्या वीटभट्टीच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या भागातील रहिवाशांकडे चौकशी केली तेव्हा संदीप व  सुशीला यांच्यात वाद सुरू होते. या कारणावरून संदीपने सुशीलाला बेदम मारहाण करून तिचा खून केला. तिचे हात ओढणीने बांधून संदीपने मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. त्यानंतर पोलिसांनी त्यास तत्काळ अटक केली.

- मोठी बातमी : दीड लाख ऊसतोड कामगार मूळगावी परतणार; राज्य सरकारची परवानगी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT