husband arrested for theft a sari for a wife in pune 
पुणे

हेच ऐकायचं बाकी होतं! बायकोची हौस पुरवायला नवरा झाला साडी चोर

सकाळवृत्तसेवा

पुणे : लग्नानंतर नवरा बायकोच्या ताटाखालचे मांजर होते असे म्हणतात हे आपण ऐकिवात आहोत. असे एक ना अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील पण, कधी बायोकोची हौस पुरविण्यासाठी नवरा चोऱ्या करतोय हे ऐकले  आहे का? विश्वास बसत नसला तर ही सत्य घटना आहे. पुण्यात बायकोला खूश करण्यासाठी साड्या, ड्रेसची चोरी करणाऱ्याला चोराला पोलिसांनी अटक केली आहे.


रोहन बिरु सोनटक्के (वय 21. रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या चोरट्यांचे नाव आहे.  नुकतेच नवीन लग्न झालेल्या या चोरट्याने बायकोला खूश करण्यासाठी अजब शक्कल लढवली. रस्त्याला उभ्या असलेल्या साड्या, ड्रेस विक्री करणाऱ्या वाहणातून चोरी करत असे आणि बायकोला साड्या, ड्रेस देत असे. इतकेच नव्हे तर हा चोरटा दुचाकी, किराणा , मोबाईल लॅपटॉप देखील  चोरायचा. दरम्यान, पोलिसांना हडपसर परिसरात गस्त घालत असताना सराईत गुन्हेगार रोहन अॅमनोरा मॉलच्या मागे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत रोहनला ताब्यात घेतले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. रोहनकडून तब्बल 13 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  त्याच्याकडे केलेल्या चौकशीत नऊ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने हडपसर, वानवडी, कोंढवा, मार्केट यार्ड, विश्रांतवाडी, पिंपरी आयुक्तालयातील चिखली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात घरफोडी आणि वाहनचोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT