husband Beating his Wife as it was too late to make Non Veg In pune 
पुणे

मटन  बनवण्यास उशीर झाला म्हणून, नवऱ्याने पाडले बायकोचे दात

सकाळवृत्तसेवा

औंध(पुणे) : मांसाहारी जेवण बनवण्यास दिड तास लागेल असे सांगितल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या तोंडावर ठोसा मारल्याने दात पडून जखमी झाल्याची घटना औंध येथे घडली आहे.

यासंदर्भात चाळीस वर्षीय महिलेने पतीविरुद्ध चतु:शृंगी  पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या औंध पोलिस चौकीत तक्रार दिली असून पोलिसांनी प्रभाकरन नाडर (वय ४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबंधित जोडपे हे औंधगाव येथे रहायला असून तीन दिवसांपूर्वी महिलेचा पती प्रभाकरनने मद्य प्राशन करून मटन  घेऊन घरी आला व पत्नीला लवकर बनवण्यास सांगितले.पत्नीच्या हातात इतर काम असल्याने मांस बनवण्यास दीड  लागेल असे सांगितले.

''पत्नी आपले ऐकत नाही याचा राग आल्याने प्रभाकरनने पत्नीला शिवीगाळ करून  तोंडावर हाताच्या ठोशांनी मारहाण केली. या मारहाणीत तोंडावर ठोसा मारला गेल्याने महिलेचे दात पडले असून संबंधित पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुढील तपास चतु:शृंगी  पोलीस  करत आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT