Pune_Crime 
पुणे

चारित्र्याच्या संशयावरून 'त्याने' पत्नीला पुलावरून नदीत ढकलले; संगमपुलाजवळ घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादानंतर गावी निघालेल्या पत्नीला पतीने संगमब्रीज येथील पुलावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून पतीच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसम्मा नागप्पा कुंभार (वय 30, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती नागप्पा शिवप्पा कुंभार (वय 37) याला पोलिसांनी अटक केली आहे. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून नागप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. भांडणावेळी तो लहान मुलींसह पत्नीला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून बसम्मा त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या, पण गाडी न मिळाल्यामुळे त्या पुन्हा घरी निघाल्या. त्यावेळी आरोपी हा संगमब्रीज येथील न्यायाधीश बंगल्याजवळ आला. त्याने पत्नीसोबत त्या ठिकाणी वाद सुरू केले.

चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. वाद सुरू असताना कुंभारने रागाच्या भरात बसम्मा यांना पुलावरून नदी पात्रात ढकलून दिले. त्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर पडल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. खडकी पोलिस पुढील तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT