husband were beaten by three for opposing marital love affair with Wife 
पुणे

Love Triangle; प्रियकराने केली विवाहित प्रेयसीच्या पतीला मारहाण

सकाळवृत्तसेवा

पुणे : विवाहित महिलेवरील प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून तिघांनी विवाहित महिलेच्या पतीला शिवीगाळ करीत उलट्या कोयत्याने मारहाण केली. या घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बिबवेवाडी येथे घडली असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

अनिल ऊर्फ शक्ती शिवशरण (वय 20), नितीन गोपीनाथ फुलारी (वय 20, दोघेही रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नाव आहेत. तर बाळू पवार हा फरारी असून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे ही वाचा : तपासणी करण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने केली शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित आरोपी हे बिबवेवाडीतील शिवतेज नगर परिसरात राहतात. तेथून जवळच अनिल शिवशरण हा राहतो. त्याचे व फिर्यादीच्या बायकोचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यास फिर्यादीने विरोध दर्शविला होता. त्याचा राग आल्यामुळे अनिल व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी एकटे गाठून उलट्या कोयत्याने जबर मारहाण केली. तर नितीन व बाळू या दोघांनी लोखंडी पट्टीचा धाक दाखवून फिर्यादी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. दरम्यान, या घटनेमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Latest Marathi News Live Update : IIT मुंबईचा वार्षिक कार्यक्रम मूड इंडिगो रद्द

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT