ICU and Casualty Ward will operational in Baramati Medical College ajit pawar Sakal
पुणे

Baramati News : बारामतीत मेडीकल कॉलेजमध्ये आयसीयु व कॅज्युलिटीसह वॉर्डही कार्यान्वित होणार

कॅपजेमिनी या कंपनीने या महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये सुसज्ज व अत्याधुनिक असा अतिदक्षता विभाग सीएसआर फंडातून तयार

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयु) शनिवारपासून (ता. 23) कार्यान्वित केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के व वैदयकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे यांनी ही माहिती दिली.

कॅपजेमिनी या कंपनीने या महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये सुसज्ज व अत्याधुनिक असा अतिदक्षता विभाग सीएसआर फंडातून तयार करुन दिला आहे. या अतिदक्षता विभागातील सहा बेड शनिवारपासून प्रत्यक्षपणे कार्यान्वित केले जाणार आहे. या ठिकाणी डॉ. राहुल मस्तुद यांच्या मार्गदर्शनाखाली इतर डॉक्टर्स व परिचारिका यांची टीम चोवीस तास येथे उपलब्ध असतील. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना याचा फायदा होईल.

दरम्यान याच रुग्णालयातील अतितातडीचा विभाग (कॅज्युलिटी) देखील शनिवारी सुरु करण्यात येणार आहे. येथे वीस बेड व छोटे ऑपरेशन थिएटर देखील कार्यान्वित करणार आहे. या मुळे अपघात किंवा तातडीच्या वेळेस या विभागाचा सर्वाधिक उपयोग होणार आहे. हा विभागही चोवीस तास कार्यरत राहणार आहे.

याच रुग्णालयातील पुरुष व महिलांचे असे दोन वॉर्डही कार्यान्वित केले जाणार असून त्याचाही लाभ ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडेल, त्यांना होणार आहे. या शिवाय रुग्णालयात एक्स रे व सिटी स्कॅनचीही सुविधा देखील चोवीस तास उपलब्ध असून रुग्ण येथे स्कॅन करु शकतात.

बारामतीच्या कोणत्याही शासकीय रुग्णालयात आयसीयु सुविधा उपलब्ध नव्हती. त्या मुळे या ठिकाणी ही सुविधा मिळाल्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. येथील आयसीयु सुसज्ज असल्याने आवश्यक सर्व सुविधाही रुग्णांना मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT