पुणे

ऐतिहासिक पत्रांतून साक्षीदारांची ओळख 

सागर शिंगटे

पिंपरी - ""कैलासवासी थोरल्या महाराज साहेबांनी न्यायनिवाडे केले. त्याप्रमाणे गोतसभा बोलावून न्यायनिवाडे करावेत,'' अशा आदेशाचा उल्लेख असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातील "महजर'पासून पेशवेकालीन, आदिलशाही, इंग्रज-मराठे यांच्या काळातील जवळपास साडेतीनशेहून अधिक ऐतिहासिक पत्रव्यवहार इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे यांनी जतन केले आहेत. इतिहासाच्या शेकडो वर्षांपूर्वीच्या या साक्षीदारांची खरी ओळख ते नव्या पिढीलादेखील घडवत आहेत. 

18 वर्षांपूर्वी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात काम करत असताना चिंचवडे यांचा इतिहासाशी संबंध आला. या माध्यमातून कित्येक गावखेडी, गडकिल्ल्यांना भेटी दिल्या. तत्कालीन राजघराणी, सरदार कुटुंबांच्या गाठीभेटी घेतल्या. त्या वेळेसच्या कारभारांवर संशोधन केले. त्यामधूनच त्यांना ऐतिहासिक पत्रे मिळत गेली. या पत्रांमधून इतिहासावर प्रकाश पडत गेला. त्या कागदपत्रांतच संभाजीराजांच्या कालखंडातील "महजर'चाही समावेश आहे. 

याबाबत चिंचवडे म्हणाले, ""छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडात 1684 मध्ये तत्कालीन बाबाजी ढमढेरे-देशमुख यांना मौजे कोरोडी येथील ढमढेरे कुटुंबातील जमिनीचा कलह सोडविण्याबाबत "महजर' पाठविली. त्यामध्ये थोरल्या महाराज साहेबांप्रमाणे न्यायनिवाडे चालू ठेवण्याचे आदेश संभाजी महाराजांनी दिल्याचा उल्लेख आहे. या "महजर'मध्ये वादी-फिर्यादी यांची नावे, पंचक्रोशीतील तत्कालीन प्रतिष्ठित देशकुलकर्णी, पाटील-देशमुख यांच्यासह इतर लोकांची पदे, त्यांचे जाबजबाबही "महजर'मध्ये नोंदविण्यात आले आहेत. संबंधित पदावरील व्यक्तींसमोर त्यांची चिन्हेही वापरण्यात आली आहेत.'' 

या "महजर'खेरीज थोरल्या बाजीराव आणि सरदार घराण्यांच्या कालखंडातील छोटेमोठे 110 रुमाल (पत्रे), 350 पत्रेही चिंचवडे यांनी जतन केली आहेत. या सर्व कागदपत्रांचा कालखंड 1540 पासून 1818 पर्यंतचा आहे. मोडी लिपी, अरबी-फारसी भाषांमधील ही पत्रे आहेत. 

शिवकालीन "शाई'चीही निर्मिती 
शिवकाळात पत्रव्यवहार करण्यासाठी सह्याद्री पर्वतरागांतील रानवेली, वनस्पतींपासून तयार केलेली शाई वापरली जात असे. त्यामध्ये कोणत्याही रसायनांचा वापर नव्हता. हिरडा, निवडुंग, जाळफुली यांसह सात नैसर्गिक घटकांचा अंतर्भाव असल्याचे संशोधनही चिंचवडे यांनी केले होते. त्याला अनुसरून त्यांनी शिवकाळातील शाईदेखील तयार करून दाखविली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT