पुणे

...तर ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळेल : पाटील

डॉ. संदेश शहा

इंदापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून देतात. हे 10 वर्षाच्या मोहंमद अनस माजिदखान पठाण या बालकाने बॅंकॉक ( थायलंड ) येथे पार पडलेल्या तिरंदाजी खेळात दाखवून दिले आहे. अनसच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे तालुक्याच्या नावलौकीकात भर पडली असून रोशन अॅकॅडमीस एक लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

येथील कामधेनू सेवा तसेच शिवभक्त परिवाराच्या वतीने लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात गुरू जुबेर पठाण, शिष्य अनस पठाण, महाराष्ट्र अर्चरी संघटनेचे संचालक आर. जे. पठाण, अनसचे वडिल माजीदखान पठाण व आई, नुतन तहसिलदार सोनाली मेटकरी, स्वच्छ अभियानात ५ कोटी रूपये मिळवून देणा-या नगराध्यक्षा अंकिता शहा, फ्लेमिंगो मुखपृष्ठावर चित्राची निवड झालेल्या रोहिणी झिंजुर्डे यांचा 
नागरी सत्कार करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी यावेळी पठाण कुटुंबिया बरोबरच मान्यवरांचासत्कार मोठ्या फुलांच्या हाराने केला. तर महेंद्र रेडके यांनी ५ हजार रूपयांची मदत रोशन अॅकॅडमीस दिली. 

रोशन अॅकॅडमीचे अध्यक्ष जुबेर पठाण म्हणाले, अकरा राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांचा अनुभव असून खेळाडू खेळातून देखील आपले करिअर यशस्वी करू शकतात. मात्र या खेळास पाठबळ मिळणे गरजेचे आहे. यावेळी करणसिंह घोलप,अॅड. कृष्णाजी यादव, देवराज जाधव, मुकूंद शहा, अॅड. हेमंत नरूटे, कैलास कदम उपस्थित होते. स्वागत मनोज मोरे यांनी तर प्रास्ताविक कामधेनूचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांनी केले. सूत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर तर आभार प्रकाश खंबूसवाडकर यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT