PDCC Bank sakal
पुणे

शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम दिलेल्या मुदतीत परतफेड केल्यास, शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार

केंद्र सरकारने आता व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

केंद्र सरकारने आता व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्यावतीने (पीडीसीसी) (PDCC Bank) चालू वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात मिळून जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पाच लाख रुपयांपर्यंतचे २ हजार ११० कोटी १९ लाख ८४ हजार रुपयांचे पीक कर्ज (Crop Loan) जिल्ह्यातील २ लाख ८५ हजार ३६४ शेतकऱ्यांना (Farmer) वाटप करण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी कर्जाची दिलेल्या मुदतीत परतफेड केल्यास, या सर्वांना शून्य टक्के व्याजाचा लाभ (Interest Profit) मिळू शकणार आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी आधी व्याजासह सर्व कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने आता व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी त्यांच्याकडील संपूर्ण कर्ज रकमेची (व्याजासह) परतफेड करणे आवश्‍यक असल्याचे बुधवारी (ता.९) जिल्हा बॅंकेतून सांगण्यात आले.

सद्यःस्थितीत १ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी दर साल दर शेकडा (द. सा. द. से.) ६ टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप केले जाते. परंतु यापैकी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी तीन टक्के व्याजाचा परतावा शेतकऱ्यांना मिळत असतो. त्यामुळे या कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाखपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळत असते.

तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठीसुद्धा व्याजदर हा सहा टक्केच आहे. मात्र यापैकी केंद्र सरकार तीन टक्के, राज्य सरकार १ टक्का आणि जिल्हा बॅक ही २ टक्के व्याजदराचा परतावा देत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्जही शून्य टक्के व्याजदराने मिळत असते. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यंदापासून पुणे जिल्हा बॅंकेचे दोन टक्के व्याजदराचा परतावा वाचणार आहे. यापुढे सहा टक्के व्याजदरापैकी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी तीन टक्के व्याज दराचा परतावा शेतकऱ्यांना देणार आहे.

  • खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप --- १ हजार ७२४ कोटी ३४ लाख ८४ हजार रुपये

  • खरीप पिकांसाठी कर्ज घेणारे शेतकरी --- २ लाख २४ हजार ३०२

  • रब्बी पिकांसाठीच कर्ज वितरण --- ३८५ कोटी ८५ लाख १० हजार रुपये

  • रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्ज घेणारे --- ६१ हजार ६२

  • दोन्ही हंगामातील एकूण कर्ज वाटप --- २ हजार११० कोटी १९ लाख ९४ हजार रुपये

  • दोन्ही हंगामातील मिळून कर्ज घेणारे शेतकरी --- २ लाख ८५ हजार ३६४

खरीप कर्जाची ३१ मार्चपर्यंत परतफेड अनिवार्य

खरीप हंगामातील पिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडील पीक कर्जाची येत्या ३१ मार्चपर्यंत परतफेड करणे आवश्यक आहे. या मुदतीत पीक कर्जाची परतफेड केली तरच, संबंधित शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळू शकणार असल्याचेही जिल्हा बॅंकेतून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT