डॉ. राजेंद्र सिंह esakal
पुणे

Pune : पीकपद्धतीत बदल न केल्यास जमीनींचे वाळवंट होणार - डॉ. राजेंद्र सिंह

गणेगाव दुमाला येथील शेतकर्‍यांशी क्षारपड जमीनीची समस्या या विषयावर बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

Pune : "जमीनी क्षारपड होऊ लागलेल्या पट्ट्यातील शेतकर्‍यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल न केल्यास जमीनींचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही." असा इशारा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ, भारताचे जलपुरुष, आंतरराष्ट्रीय पूर व दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला. ते गणेगाव दुमाला ( ता. शिरूर, जि. पुणे ) येथील शेतकर्‍यांशी क्षारपड जमीनीची समस्या या विषयावर बोलत होते.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील क्षारपड जमीनीची सुधारणा कामाची पाहणी करण्यासाठी ते तांदळी व गणेगाव दुमाला याठिकाणी आले होते. या परिसरातील ऊस शेती, पीक पद्धती, सिंचन पद्धती, रासायनिक खतांचा वापर व मिळणारे उत्पन्न याविषयी येथील शेतकर्‍यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. शेती करताना पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च, त्या तुलनेत कमी मिळणारे उत्पादन व उत्पन्न, यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी याविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, "शेतात लाखो रुपयांची रासायनिक खते टाकण्या ऐवजी शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न जाळता आपल्या शेतातच कुजवले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुकटातले कंपोस्ट खत मिळेल व रासायनिक खतांचा खर्च कमी होईल. पिकांना पाणी देण्यासाठी पाटपाण्याचा वापर करण्याऐवजी ठिबक सिंचनाचा व तुषार सिंचनाचा वापर करावा.

उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जमीनीची सुपीकता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी भविष्याचा विचार करून शेती करावी." याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य, जलदूत राजेंद्र गदादे, काकासाहेब खळदकर, राजेंद्र कोंडे, गणेगावचे सरपंच तुकाराम निंबाळकर, पोपट निंबाळकर, सचिन मचाले व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी पन्नास शेतकऱ्यांचा गट तयार करून सेंद्रिय शेती करण्याची तयारी दाखवली. यावेळी यशदा या संस्थेचे कार्यकारी संचालक, राज्य स्तरीय नदी संवाद यात्रेचे सदस्य डॉ. सुमंत पांडे, भूगर्भ तज्ज्ञ डॉ. बडगबळकर, मानवलोकचे अनिकेत लोहिया, उमेद संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक सपना करकांडे, जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुघ, जलनायक रमाकांत कुलकर्णी, अनिल पाटील, जलसंपदा विभागाचे श्री. देवकर, श्री. जगताप हे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब खळदकर यांनी तर आभार सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : विद्यार्थ्यांना मुख्य संदेश हाच द्यायचा आहे की, आम्ही तुमच्या सोबत आहोत - राहुल गांधी

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT