Kasaba Bypoll Esakal
पुणे

Kasaba Bypoll: टिळकांना उमेदवारी देतो, दोन्ही निवडणूका बिनविरोध करा? चंद्रकांत पाटलांची गुगली

टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक महाविकास आघाडीने लढण्याचे ठरवले. त्यावर भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यासंबधी पत्र लिहले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन केलं होतं.

निवडणूक बिनविरोध करण्याच्या या आवाहनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं होतं की, जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी चांगलंच समाचार घेतला आहे.

टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? असा थेट प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना केला आहे. तर चिंचवडमध्ये घरातील उमेदवार दिला आहे मग तिथे का नाही बिनविरोध केली. आम्ही पुढच्या 48 तासात मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी दिली तर दोन्ही निवडणुका बिनविरोध करणार का असा सवालही पाटील यांनी यावेळी केला आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

निवडणुकीकरिता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT