ayushman bharat
ayushman bharat 
पुणे

‘आयुषमान’बाबत अनभिज्ञता

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या तीन महिन्यांत आजारी असलेल्या शहरी गरीब गटातील ९३ टक्के नागरिकांना ‘आयुषमान भारत’ या योजनेची माहिती नसल्याचे सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲण्ड रिसर्चने (सिफार) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणातून शहरी गरीब लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचते का? त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सार्वजनिक सेवा सुविधांबाबतची परिस्थिती जाणून घेण्याचा या सर्वेक्षणातून प्रयत्न केला गेला. 

सर्वेक्षणानुसार ०.८ टक्के व्यक्तींकडे कोणतेच ओळखपत्र नसल्यामुळे कोणत्याही सरकारी योजनांपासून ते वंचित राहिले आहेत. सहा टक्के शहरी गरिबांकडे आधार कार्ड, नऊ टक्के (७९) व्यक्तींकडे पॅन कार्ड आणि सात टक्के (८३) व्यक्तींकडे मतदार ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले. असंघटित क्षेत्रात काम करण्याऱ्या सात टक्के नागरिकांकडे रेशन कार्ड नाही. एकूण ३० टक्के शहरी गरीब नागरिक मागील तीन महिन्यांत आजारी होते. त्यातील ९३ टक्के नागरिकांना आयुषमान भारत या योजनेची माहिती नसल्याचे आढळून आले. 

बांधकाम मजूर, घरकामगार, रोजमजुरी कामगार, घरबसल्या काम करणारे कामगार, किरकोळ विक्रेते आणि एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती या मुख्य जनसमुदायांनी गंभीर आजारांच्या उपचारांसाठी अर्थसाहाय्य आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. येरवडा आणि विश्रांतवाडीतील २७ वस्त्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती सिफारचे राज्य प्रकल्प समन्वयक प्रमोद गोगावले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT