online11.jpg
online11.jpg 
पुणे

चार वर्षापूर्वी निर्देश देऊनही 'यूजीसी'च्या ऑनलाइन अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष

ब्रिजमोहन पाटील

पुणे : विद्यापीठ, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून कौशल्य आत्मसात करणे आवश्‍यक होते, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चार वर्षापूर्वीच निर्देश दिले होते. मात्र, बहुतांश संस्थांनी व विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ऑनलाइन शिक्षणाचा प्रवास खडतर झाला आहे. 

कोरोनामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे. शैक्षणिक संकुले विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा कधी गजबजतील, याबाबत शाश्वती नाही. अशा काळात ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग निवडला जात आहे. प्राध्यापकांचे "झूम'द्वारे क्‍लास, पीपीटी, पीडीएफद्वारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, व्हिडिओ तयार करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, यासाठी खटाटोप सुरू आहे. मात्र, यातून लगेच सक्षम व्यवस्था उभी राहील, अशी शक्‍यता नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापराने बदल आवश्‍यक असल्याने "यूजीसी'ने 2016 मध्ये परिपत्रक काढून 'स्वयं' हा या ऑनलाइनवर पोर्टल उपलब्ध केले. त्यात परिणामकारक डिजीटल शिक्षणासाठी किमान 20 टक्के क्रेडीट ट्रान्सफर हे इ कंटेंटच्या माध्यमातून व्हावे यासाठी 'स्वयं' वरून ऑनलाइन शिक्षणाचे धडे घ्यावेत, पदवीसाठी आवश्‍यक असलेले दोन हजारपेक्षा जास्त पूरक कोर्स उपलब्ध केले. मात्र, याकडे महाविद्यालयांनी दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी "क्रेडीट टान्सफर'साठी ऑनलाइन शिक्षण घेतले नाही. मोजके व्यवसायिक अभ्यासक्रम सोडले तर इतर अभ्यासक्रमांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे येत्या काळात 'स्वयं'वरील ऑनलाइन अभ्यासक्रमात सहभाग वाढवणे आवश्‍यक होणार आहे. 
प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

पुणे विद्यापीठाचा पुढाकार 

ऑनलाइन शिक्षणाची गरज अधोरेखीत झाल्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरवात केली आहे. पुणे विद्यापीठाने 'स्वयं', "इ-पाठशाळा' यांच्या धर्तीवर किमान 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन करण्यासाठी काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना विद्यापीठातील "इएमआरसी', "इ कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओ' चा वापर करता येणार आहे. 

ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात "यूजीसी'ने 2016 मध्ये निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठातील काही विभागांनी 'स्वयं'वरून 20 टक्के "क्रेडिट टान्सफर'साठी कोर्स घेतले आहेत. महाविद्यालय स्तरावर यादृष्टीने काम सुरू आहे. 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT