IGNOU sakal
पुणे

IGNOU : जुलै सत्राच्या प्रवेशांना सुरवात ३० जून पर्यंत ऑनलाईन अर्ज; गृहिणी आणि नोकरदारांनाही संधी

पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षण घेऊ इच्छिणारा कोणीही या अभ्यासक्रमांना नियमानूसार प्रवेश घेऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) जुलै २०२३ च्या सत्रातील प्रवेशांची घोषणा करण्यात आली आहे. पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम ३० जून पर्यंत असून, आपल्या जवळच्या अभ्यासकेंद्रात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुले करणाऱ्या इग्नूच्या अभ्यासक्रमांमध्ये मागील काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख अभ्यासक्रमांना उमेदवारांची पसंती असल्याचे पुण्यातील इग्नूचे वरीष्ठ विभागीय संचालक डॉ.डी.आर. शर्मा यांनी सांगितले.

नवीन प्रवेशासाठी उमेदवारांची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अनुसुचित जाती आणि जनजातीच्या विद्यार्थ्यांना बी.ए., बी.कॉम आणि बी.एससी च्या अभ्यासक्रमांना निःशुल्क प्रवेश मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षण घेऊ इच्छिणारा कोणीही या अभ्यासक्रमांना नियमानूसार प्रवेश घेऊ शकतो.

इग्नूच्या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्ये :

  • आपल्या वेळेत नवं काही शिकण्याची संधी मिळते

  • कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची संख्या वाढली

  • तीन महिन्यांपासून ते दीड वर्षापर्यंतचे कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध

  • कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसह कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक्रम

  • जवळच्या अभ्यासकेंद्रात शिकण्याची संधी

प्रवेशाचे संकेतस्थळ -

https://ignouadmission.samarth.edu.in

पुणे क्षेत्रात ३५ अभ्यासकेंद्र असून विभागीय कार्यालयही एक स्वतंत्र अभ्यास केंद्र आहे. आयटीआय आणि प्रधानमंत्री कौशल्य केंद्रांचाही यात समावेश असून, कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची संख्याही यंदा वाढली आहे. इच्छूक उमेदवारांनी आपला प्रवेश लवकरच निश्चित करावा.

- डॉ. डी.आर. शर्मा, वरिष्ठ विभागीय संचालक, इग्नू, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT