Crime1.jpg
Crime1.jpg 
पुणे

बेकायदा धंदे कधी बंद होणार ? आळंदीकरांचा प्रशासनाला सवाल

विलास काटे

आळंदी (पुणे) : आळंदी आणि वडमुखवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, दारू, बेकायदा लॅजिंग तेजीत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी आल्यावर कुठलेही सॅनिटायझर नाही. सोशल डिस्टन्स पाळलेच पाहीजे असे काही नाही. पोलिसांच्या आर्शिवादाने सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद कधी होणार असा सवाल आळंदीकर विचारत आहे. दोन वर्षांपूर्वी पिंपरी पोलिस आयुक्तालय स्वतंत्र झाल्यानंतर आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिसांची संख्या दहा पट वाढली. सोबत वरिष्ठ पोलिस निरिक्षक, गुन्हे शाखेसाठी पोलिस निरिक्षक, सहायक पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक असा अधिकारी वर्गही देण्यात आला.

मात्र, पोलिसांची संख्या वाढली तरी अवैध धंद्याना यांचा धाक राहिला नाही. याउलट पोलिसांच्याच आर्शिवादाने सर्व धंदे सुरू असल्याची चर्चा आळंदीत आहे. कोरोना काळातही धंदे बंद झाले नाहीत. याउलट कोरोना काळात घुंडरे गल्लीतील गांजाचा धंदा तेजीत होता. पुण्यासारख्या शहरात पहाटेच गर्दुले खरेदीसाठी येत. गेल्या दोन वर्षात आळंदीतील अवैध धंद्यांच्या संख्येत वाढ झाली. मटका एक होता आता चार धंदे झाले. केळगाव आळंदी रस्ता, इंद्रायणी नगर रस्ता आणि देहूफाट्यावरील मटक्याचे धंदे ऐन वर्दळीच्या ठिकाणी आहेत. अवैध दारू धंद्यांचे प्रमाणही वाढले आणि ढाबा हॉटेलातही दारू मोठ्या प्रमाणात मिळू लागली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदी गावठाणातही दारू धंदे वाढले. माऊलींच्या मुख्य समाधी मंदिराच्या लगतच्या भिंतीला लागून जुगाराचे अड्डे दिवसाढवळ्या सुरू आहेत. जुगारासाठी साठ ते सत्तर हजार तर मटक्यासाठी अडीच लाख रूपये मोजले जात असल्याची चर्चा आहे. याचबरोबर आळंदी गावठाण तसेच देहूफाटा येथे अवैध लॉजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लॉजमुळे स्थानिक महिलांनाही घराबाहेर पडणे मुश्किल झाले. आळंदी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर रूजू झाले आणि अवैध धंदे बंद करणार असे सांगितले. मात्र, त्यांच्याच काळात अवैध धंद्यात वाढ झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 मरकळ, कोयाळी, हनुमानवाडी या ठिकाणी ढाब्यांवर चोरट्या मार्गाने दारू पुरवली जाते. तर हातभट्टीची निर्मितीही चिंबळी, मरकळ, कोयाळी, धानोरे गावात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जमिनीचे ताबे देण्यात तर पोलिस खाते अधिक अग्रेसर झाल्याचे चित्र आहे. एकंदर हम करे सो कायदा याप्रमाणे आळंदीत पोलिस वागत असल्याचे चित्र आहे. आळंदी आणि देहूफाट्यावरील अवैध धंद्यामुळे तरूणाई वाममार्गाला लागली.तर महिला, मुली, विद्यार्थी यांना या भागातून फिरणे मुश्किल झाले. अधूनमधून पोलिस लुटूपुटूची कारवाई करतात. म्होरक्या सोडून पंटरवरच कारवाई केली जाते. केवळ कागदपत्रे रंगवण्यापुरती पोलिस कारवाई करतात. पुन्हा धंदा सुरू असे चित्र आहे. पिंपरी आयुक्तालयाचे आयुक्त बदलले आता तरी आळंदीसारखे तिर्थक्षेत्र अवैध धंद्यापासून मुक्त होईल का अशी विचारणा वारकरी आणि आळंदीकर विचारत आहेत. 

आळंदीत पोलिसांना वरिष्ठांकडून होणा-या कारवाईची भिती राहिली नाही. फारफार तर बदली होईल. नाही तर माऊलींच्या गावात टाळ कुटू. सवय लावून घेवू दुसरे काय अशी उपरतीची भाषा काही पोलिस बोलून दाखवत आहे. सध्या आळंदी पोलिस ठाण्यातील अनेक पोलिस बदलीच्या प्रतिक्षेत असून पाच वर्षापेक्षा अधिक काळ काम करत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT