Crime
Crime 
पुणे

बेकायदेशीर उपसा करून विक्रीसाठी आलेल्या वाळू ट्रक वर कारवाई; चालक-मालक झाले फरार

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी - पुणे जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर तलाठ्यांनी कारवाई केली. वाळू उपसा करून लोहगाव इथं ट्रक मध्ये भरून विक्रीसाठी आलेला ट्रकवर कळस विभागाचे मंडल अधिका-यांनी अन लोहगावच्या तलाठयांनी कारवाई केली. दरम्यान कारवाईच्या अगोदरच ट्रक चालक फरार झाला होता. तर कारवाई वेळी कोणी ट्रकचालक किंवा मालक उपस्थित नसल्याने पोलिसांच्या मदतीने ट्रक प्रांत ऑफिसला जप्त करण्यात आला.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कळस सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या लोहगाव, खराडी, वडगावशेरी, येरवडा, विश्रांतवाडी भागात बेकायदेशीर नदीतून उपसा केलेली वाळू ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी रोज येत आहेत. प्रशासकीय कारवाईच्या उदासीनतेमुळे वाळू माफियांनी या भागात चांगले प्रस्थ केले आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल रोज वाळू माफिया बुडवत आहेत.  वाळू माफिया पहाटेच्या वेळी चोरून ट्रक विक्रीसाठी आणून ट्रक आतील रस्त्यावर थांबवत होते. 

गुरुवार (दि. ९) रोजी लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पेट्रोलपंपावर वाळूचा ट्रक भरून वाळू विक्रीसाठी उभा आल्याची माहिती मंडळ अधिकारी बी.व्ही. शेंडगे, तलाठी एच.एस. पोळ यांना मिळाली. त्यांनी जाऊन पहाणी केली, आजूबाजूला पाहिले तर ट्रकचालक नव्हता. गाडीमध्ये कोणतीही कागदपत्रे नव्हती. याशिवाय ट्रकवर मागे नंबर नव्हता, पुढे जो नंबर होता तोदेखील डुप्लिकेट होता. तलाठी यांनी विमानतळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने ट्रक लोहगाव चौकीला आणण्यात आला. त्यानंतर प्रांत कार्यालयात ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती मंडल अधिकारी बी.व्ही. शेंडगे यांनी दिली. 

मंडल अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने वाळूमाफियांवर कारवाई करावी व शासनाला महसूल मिळवून द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. यासंदर्भात तलाठी एच. एस.  पोळ म्हणाले, ग्रामीण भागातून वाळू येत असून पोलीस पथक व प्रशासनाने त्यावर त्या भागात कारवाई केली पाहिजे. तर शहरात वाळू येणार नाही. आपणदेखील पथक नेमून वारंवार कारवाई करणार असल्याचे त्यांनी स॔गितले..

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT