imd alert heavy rain in pune rain update monsoon weather update esakal
पुणे

Pune Rain Update : भारतीय हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा: पुणे शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस !

बुधवारी सकाळपासूनच पुणे शहरात संततधार पावसाने हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुण्यासह राज्यातही मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्याचबरोबर सर्वत्र संततधार आणि कोकण-घाट माथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली, अशा स्थितीत पुणे शहरासाठी हवामान विभागाने ही अंदाज वर्तवला आहे.

बुधवारी सकाळपासूनच पुणे शहरात संततधार पावसाने हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. मागील 24 तासात लोणावळा आणि परिसरात 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहरातही पाषाण येथे १० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला असून, आज दिवसभरात ही ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी आज कामावर निघताना पावसाळी रेनकोट आणि छत्री सोबत ठेवावी.

बंगालचे उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवडले असले तरी, राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांचा ओघ कायम आहे. कोकण, पश्चिम- मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. पुढील तीन-चार तासांसाठी कोकणात मुसळधार, तर पुणे, नगर, नाशिक, बीड, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT