Rain 
पुणे

पुण्यात पावसाचा जोर वाढणार की कमी होणार? हवामान खात्याने वर्तवलाय 'हा' अंदाज!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरात काही भागांमध्ये जोरदार, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह शनिवारी (ता.२५) पावसाने हजेरी लावली होती.

बिबवेवाडी, आळंदी तसेच पुण्यातील उत्तरी भागात जोरदार पाऊस पडला. शहरातील पेठांचा भाग, कोथरूड, पाषाण, खडकवासला, कोंढवे-धावडे, वारजे, कात्रज, सिंहगड रस्त्यासह उपनगरांमध्येसुद्धा पावसाच्या सरी पडल्या. रात्री साडे आठपर्यंत ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

शहरात काही ठिकाणी सकाळी ऊन होते. मात्र सायंकाळी सहा नंतर शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पाषाण येथे २४.१ मिमी आणि लोहगाव येथे ६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. रविवारनंतर (ता.२६) पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून शहरात हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

"शहरात सगळीकडे रविवारी (ता.२६) सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. तर येत्या दोन दिवसात पाऊस कमी होण्याची शक्यता असून बुधवारी (ता.२९) पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती येत्या दोन दिवसात दिली जाईल."
- अनुपम काशयपी, हवामानशास्त्रज्ञ- भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)

दरम्यान, राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकण-गोव्यातील तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तसेच येत्या चार दिवसांमध्ये कोकण गोव्यातील बहुतांश, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमधील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १ ते २५ जुलै पर्यंत २७४.९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून तो सरासरीच्या तुलनेत ५ टक्के जास्त आहे. तर येत्या बुधवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोषक वातावरण निर्मिती झाल्याने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT