पुणे

लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रसार थांबेल?

सकाळवृत्तसेवा

पुणे- कोरोनाची वैश्‍विक साथ थोपविण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरवात झाली आहे. भारतातही स्वदेशी भारत बायोटेक उत्पादित ‘कोव्हॅक्‍सिन’ आणि सिरम उत्पादित ‘कोव्हीशिल्ड’ लसींच्या लसीकरणाला शनिवार (ता. १६) पासून सुरवात होत आहे. लस घेतल्यावर रोगप्रतिकारशक्ती तयार होईल; पण कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल का? त्याबाबत घेतलेला आढावा...

लस टोचल्याने काय होते?
विशिष्ट रोगाविरूद्ध लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लसी करतात. यामध्ये रोगाच्या विषाणूविरूद्ध लढणाऱ्या प्रतिपिंडांना तो शरीरात येण्याआधीच सज्ज ठेवण्याचे काम लसीकरणाच्या माध्यमातून होते. सामान्यतः लसीद्वारे शरीरात त्या रोगाला कारणीभूत अर्धमेले विषाणू किंवा त्याच्याशी निगडित प्रथिने सोडली जातात. अर्धमेल्या विषाणूंवर तुटून पडण्याची सवय प्रतिपिंडांना (अँटीबॉडी) होते. एकदा ही रंगीत तालीम झाली की, असे विषाणू आल्यावर रोगप्रतिकारशक्ती सज्ज होते. 

लसीसंदर्भात नवं काय?
सध्या वापरातील कोरोनाच्या सर्व लसी या प्रतिपिंडांच्या (अँटीबॉडी) ‘इम्यूनोग्लोबीन-जी’ या प्रकाराशी निगडित आहे. प्रतिपिंडांचा हा प्रकार सर्वच परजीवी घटकांशी लढत असतो. अवयवाच्या आतल्या भागात असणारे हे प्रतिपींड आपली संख्या वाढवितात आणि दरोडा टाकल्यासारखे विषाणूंवर तुटून पडतात. परंतु, कोरोनाच्या बाबतीत थोडे वेगळं प्रकरण आहे. प्रतिपिंडांचा अजून एक प्रकार यात सहभागी आहे. नाक, घसा, फुफ्फुसे आदी श्‍वसनाशी निगडित अवयवांच्या बाहेरच्या भागाचे परजीवींपासून रक्षण करण्यासाठी ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ नावाचे प्रतिपिंडे कार्य करतात. त्यामुळे ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ हे प्रतिपिंडेही श्‍वसनाशी निगडित असलेल्या कोरोनाच्या विषाणूविरुद्ध सज्ज व्हायला हवेत, जेणेकरून कोरोनाचा प्रसारही रोखला जाईल. कारण, शिंकणे आणि खोकण्यातून विषाणू बाहेर पडतात.

कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीमधून प्रसार कमी?
कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीमध्ये ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ नावाचे प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. ते श्‍वसनमार्गावर ‘सार्स कोविड-२’ विषाणू राहत असलेल्या ठिकाणची जागा व्यापतात. पर्यायाने तेथून या विषाणूंचा प्रसार मोठ्या प्रमाणावर रोखला जातो. त्या तुलनेत लस घेतल्यानंतर ‘इम्यूनोग्लोबीन-ए’ ही प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणावर तयार होतीलच असे नाही. 

लसींमुळे व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार थांबेल?
लसींमुळे शरीरात वाढणारी ‘इम्यूनोग्लोबीन-जी’ हे प्रतिपिंडे श्‍वसनमार्गातून कोरोना विषाणूंच्या प्रसाराला किती थांबवतात, याबद्दल ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाही. जरी एखाद्या लसीमुळे श्‍वसनमार्गाच्या वरच्या भागात कोरोना विषाणूंची वाढ किंवा प्रजनन थांबवले, तरी तिथून विषाणूंच्या प्रसाराला ती व्यक्ती किती रोखते, हे आत्ताच सांगता येत नाही.

भारताचे वेगळेपण काय?
देशातील कोरोनाचा मृत्यूदर लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे. ढोबळमानाने भारतीयांची कोरोनाविरूद्ध लढणारी रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. याचा अर्थ हर्ड इम्युनिटी विकसित झाली असा नाही. कारण, देशातील ७० टक्के लोकांपर्यंत कोरोना पोचलाच नाही. भारतात आजवर झालेले लसीकरण, विषाणू आणि जिवाणूंशी येणारा संपर्क आदी घटकांमुळे शरीरात विकसित झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्तीचा उपयोग होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे भारताच्या बाबतीत लस घेतल्यानंतर व्यक्तिगत पातळीवर कोरोनाचा प्रसार कमी असेल. 
(स्रोत ः नेचर शोधपत्रिका, तज्ज्ञ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT