Implement Abhay Yojana residents of old society demand to state government 
पुणे

मुद्रांक शुल्कात सवलत दिली, अभय योजनाही लागू करा

सकाळवृत्तसेवा

पुणे: ''1980 मधील आमची सोसायटी आहे. सोसायटीमध्ये 20 प्लॉट आहेत. केवळ स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला आहे. सोसायटीचे पुनर्विकास करावयाचा आहे. परंतु रजिस्टर केले नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. रजस्टिर कार्यालयात चौकशी केली तर मुद्रांक शुल्क आणि त्यावर दंड भरा असे सांगितले जाते. ती रक्कम फार मोठी होते, काय करावे?'' ही व्यथा आहे पत्र्या मारुती को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील रहिवासी नितीन माने यांची.

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या 1980 ते 90 दशकातील अशा अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांपुढे असा प्रश्‍न निर्माण उभा आहे. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांनी सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर ज्या सोसायट्या जुन्या आहेत. गेली पस्तीस ते चाळीस वर्ष त्या सोसायट्यांमध्ये नागरिक राहत आहेत. परंतु त्यांचे दस्त रजिस्टर झालेले नाहीत, अशा सोसायट्यातील रहिवाशांसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा अभय योजना राबवावी, अशी मागणी होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरेदीचे करारनामे रजिस्टर केले नाहीत, त्यामुळे इमारतींचा पुनर्विकास अथवा खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना अशा सोसायट्यातील नागरिकांना आणि दुकानदारांना अडचणी येत आहेत. करारनामा नोदवायचा म्हटले, तर मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंड दोन्ही भरावा लागतो. ती रक्कम काही लाखांच्या घरात जाते. जर सदनिका अथवा दुकाने विकायचे असेल, तर दोनदा स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. त्यामुळे सोसायटीचा पुनर्विकासही करता येत नाही. तसेच अशा सोसायटीतील सदनिका व दुकानांची खरेदी- विक्री देखील करता येत नाही, अशा कात्रीत नागरिक अडकले आहेत. 

मी राहतो ती सोसायटी 36 वर्ष जुनी सोसायटी आहे. तेव्हा या सोसायटीतील सदनिका स्टॅम्प पेपरवर खरेदी करण्यात आली आहे. त्यावेळी रजिस्टर करण्यात आला नाही. आज सदनिकेची विक्री करावयाची झाली, तरी अडचण येते आणि सोसायटीचा पुनर्विकास करावयाचा झाला, तरी अडचण येत आहे. सरकारने मार्ग काढून आमच्या सारख्या सोसायटीधारकांना दिलासा द्यावा. 
- सागर आवटे (अनिरुद्ध सोसायटी) 

पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!

शहरातील अशा अनेक जुन्या सोसयट्यातील नागरिकांकडून ही मागणी होत आहे. परंतु अभय योजना लागू करण्याचे अधिकार हे राज्य सरकारांचे आहेत. यापूर्वी 1994,97, 2003 आणि 2009 अशी चार वेळा अभय योजना राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही अनेक अशा सोसायट्या आहेत. त्यांना काही अटी-शर्तींवर राज्य सरकारने शेवटची संधी देण्यास काही हरकत नाही. 
- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ज्ञानेश कुमार यांना तूर्तास दिलासा मात्र विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गंभीर; केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Tapola-Ahir Bridge Traffic Closed : तापोळा-आहिर पुलावरून वाहतूक बंद; स्काय गॅलरीच्या बांधकामामुळे नागरिकांच्या प्रवेशावर तात्काळ बंदी, कंपनीचे सरपंचांना थेट पत्र

रशियात टेस्ट ट्यूब फुटली अन् पसरला अत्यंत घातक 'न्यूमोनिक प्लेग'! २८ वर्षीय महिला टेक्निशियनचा मृत्यू; १९७ जण क्वारंटाइन

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

'घरोघरी मातीच्या चुली' फेम रेश्मा शिंदेकडे गुड न्यूज? बेबी बम्पसोबतचे फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

SCROLL FOR NEXT