drtug.jpg 
पुणे

पिंपरी : औषधांच्या दुकानांबाबत महत्वाचा निर्णय 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील घाऊक आणि किरकोळ आैषधे विक्रेत्यांनी २७ एप्रिलपर्यंत दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अत्यावश्यक आैषधांची घरपोच सेवा पूर्वी प्रमाणेच चालू राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ४०० घाऊक तर जवळपास १६०० किरकोळ आैषधे विक्रीची दुकाने आहेत. शहरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जीवनावश्यक सेवा म्हणून आैषधे दुकाने पूर्ण वेळेसाठी सुरळीत ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र, आता कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्येला आळा घालण्याच्या पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ म्हणून आैषधे विक्रेत्यांनी स्वतः ची दुकाने १० ते २ या वेळेतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड घाऊक आैषधे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनीही याला दुजोरा दिला. खिंवसरा म्हणाले, "अनेक लोक आैषधे आणण्याच्या बहाण्याने बाहेर अनावश्यकपणे फिरत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी तसेच आॅल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक अप्पासाहेब शिंदे यांच्या सूचनेनुसार २७ एप्रिलपर्यंत सर्व घाऊक आैषधे दुकाने सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालू राहतील. रूग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल."

पिंपरी-चिंचवड रिटेल केमिस्ट असोसिएशनचे सदस्य नरेंद्र आगरवाल म्हणाले, "शहरात सुमारे १६०० किरकोळ आैषधे विक्रेते आहेत. त्यांच्या मार्फत, मधुमेह, रक्तदाब, डायलिसिस यासारख्या तातडीच्या रूग्णांना घरपोच आैषधे पुरविण्याची सेवा पूर्वी प्रमाणेच चालूच राहणार आहे."
Corona Virus : विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावी परत जाऊ द्या

रूग्णालयाशी संलग्न दुकाने पूर्वीप्रमाणे चालू- शहरात अनेक रुग्णालयांना आैषधे विक्रेत्यांची दुकाने संलग्न आहेत. त्यांची जवळपास २०० इतकी संख्या आहे. ही दुकाने पूर्वी प्रमाणेच चालू राहतील, असे जिल्हा संघटन सचिव रवी पवार यांनी म्हटले आहे.
 

औषधांसाठी हेल्पलाईन क्रमांक- संतोष खिंवसरा 9860718185, प्रांजल पाटील 7774003242, रवी पवार 9850275824, मदन चौधरी 7387178930, विवेक तापकीर 9422006623, राहुल शेंडगे 9860699908, प्रसाद शितोळे 9822450707.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT