corona logo 
पुणे

शिरूरच्या तहसीलदारांनी उचलले महत्त्वाचे पाऊल 

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडकडीत बंद असला, तरी पुणे व मुंबई येथून तरकारी, फळे घेऊन ग्रामीण भागातील गावांमध्ये विक्रेते व्यापाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांना देखील 14 दिवस क्वारटांइन करण्याचा आदेश शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिला आहे. 

जीवनावश्‍यक वस्तू, भुसार व तरकारी व इतर वाहतूक मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून करून व्यापारी किंवा नागरिक पुन्हा गावी परत येतात. त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने याबाबत दक्षता घेऊन अशा लोकांचा संपर्क न होता त्यांना क्वारंटाइन करावे. गांभीर्याने या गोष्टींचा विचार करून कारवाई करावी, असा आदेश तहसीलदार शेख यांनी दिला आहे. 

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पुणे व मुंबई येथून किराणा मालाचा भूसारच्या गाड्या आल्या आहेत. तरकारी, अक्षय तृतीयेला आंब्याची आवक झाली आहे. अशी दुकाने थाटून बसणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे या परिसरात धोका निर्माण झाला आहे. तत्काळ अशा दुकानदारांना क्वारंटाइन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT