pune-municipal-school
pune-municipal-school 
पुणे

पुणे महापालिकेच्या शाळांबाबत महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील शाळा (school) पुन्हा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या बारा शाळा (Municipal school) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या 44 शाळांपैकी एकूण 34 शाळा सुरू झाल्या असून त्यात 13 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मात्र पुन्हा शाळेत जाण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. येत्या पाच दिवसांत खासगी शाळा सुरू करण्यासाठी पूर्व तयारी सुरू असल्याचे दिसून येते. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020पासून राज्यातील शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबरपासून शाळेतील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने राज्यातील शाळा सुरू झाल्या. पुणे महानगरपालिकेने देखील सोमवारपासून (ता.4) महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याला परवानगी दिली. त्यामुळे पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत. 

महापालिकेच्या शाळांमधील 13 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती 
महापालिकेच्या 44 माध्यमिक शाळांपैकी मंगळवारपर्यंत जवळपास 34 शाळा सुरू झाल्या आहेत. 44 शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गात सुमारे आठ हजार 759 विद्यार्थी शिकत आहेत. त्यातील केवळ 13.79 टक्के विद्यार्थी म्हणजेच जवळपास एक हजार 208 विद्यार्थ्यांनी मंगळवारी हजेरी लावली. यात इयत्ता नववीच्या 455, दहावीच्या 617, अकरावीच्या 33 आणि बारावीच्या 103 विद्यार्थ्यांची उपस्थित होते, अशी माहिती महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी दौंडकर यांनी दिली. 

खासगी शाळांची पूर्वतयारी सुरू; येत्या पाच दिवसात होणार सुरू 
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील जवळपास चौदाशे शाळा 7 ते 11 जानेवारीदरम्यान सुरू होणार आहेत. सध्या शाळांमध्ये शिक्षकांची कोरोना तपासणी, पालकांकडून संमतिपत्र घेणे, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, अशा पूर्व तयारीचा वेग वाढत आहे. दहावी ते बारावीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती दिली आहे. जानेवारी अखेरपर्यंत जवळपास 80 टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहण्याची शक्‍यता आहे.'' 
- राजेंद्र सिंह, कार्याध्यक्ष, फेडरेशन ऑफ स्कूल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र 

जिल्ह्यातील 6.9 टक्के विद्यार्थी हजर 
जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या जवळपास दोन हजार 68 शाळा असून त्यात 12 लाख तीन हजार 128 विद्यार्थी शिकत आहेत. डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 721 शाळा सुरू झाल्या होत्या. त्यात जवळपास 47 हजार 453 विद्यार्थ्यांची हजेरी होती. तर सोमवारपर्यंत जिल्ह्यातील 44.8 टक्के शाळा सुरू झाल्या असून त्यात 6.9 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. 

पुणे जिल्ह्यातील शाळांची सद्यःस्थिती : 
इयत्ता नववी ते बारावीच्या एकूण शाळांची संख्या : 2,068 
9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या : 12,03,128 
4 जानेवारीपर्यंत सुरू झालेल्या शाळा :927 
4 जानेवारीपर्यंत शाळेत उपस्थितीत विद्यार्थी :82,477 
आतापर्यंत सुरू झालेल्या शाळांची टक्केवारी : 44.8 टक्के 
आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी : 6.9

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT