पुणे

मुंबई-पुण्यात लॉकडाउनपूर्वीच कमी झाली रुग्णसंख्या; संशोधकांचा निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबई, पुणे आणि ठाणे या महानगरांमध्ये लॉकडाउन करण्यापूर्वीच कोरोनाबाधितांची संख्या स्थिर होऊन कमी होऊ लागली होती. पण, पुण्याच्या ग्रामीण भागात लॉकडाउननंतरही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती, असा निष्कर्ष अभ्यासातून निघाला आहे. त्यामुळे भविष्यात साथनियंत्रणासाठी लॉकडाउन हा पर्याय नेमका कुठे आणि कधी वापरायचा हे आता विचार करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट दिसते.

महाराष्ट्रातील लॉकडाउन आणि कोरोनाबाधितांची संख्या याचा अभ्यास मुंबई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि’मधील (आयआयटी) प्रा. मिलिंद सोहनी आणि संशोधक निखिल टिकेकर यांनी ‘महाराष्ट्र : वेव्ह १, वेव्ह २ ॲण्ड फ्युचर’ या माध्यमातून केला आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला.

Lockdown

टिकेकर म्हणाले, ‘‘लॉकडाउनमुळे लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण कमी होते. त्यातून संसर्ग रोखला जातो. दुसरे म्हणजे, संसर्गाचे प्रमाण खूप वाढल्यानंतर तो कमी होण्यास सुरवात होते. या वर्षी पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये लॉकडाउन करण्यापूर्वीच रुग्णसंख्येचा उच्चांक होऊन ती संख्या कमी होण्यास सुरवात झाली होती. याचं कारण, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून इतक्या लोकांना संसर्ग झाला, की नवीन संसर्ग होऊ शकला नाही. त्यामुळे ते प्रमाण कमी होण्यास सुरवात झाली. लॉकडाउनचा परिणाम म्हणून संसर्गाचे प्रमाण वेगाने कमी झाले. हे फक्त पुणे, मुंबई आणि ठाण्यात झाले. राज्याच्या इतर भागात संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते.’’


नागपूरमध्ये का वाढली रुग्णसंख्या?
पुणे, मुंबईमध्ये पहिली लाट खूप मोठी होती. राज्यभरात पहिली लाट सात महिने सुरू होती. तर, दुसरी लाट सलग चार महिने होती. पहिली लाट पुण्यापेक्षा मुंबईत जास्त होती. नागपूरपेक्षा पुण्यात मोठी होती. दुसरी लाटेत सर्वांत कमी संसर्ग मुंबईत होता. त्या खालोखाल पुण्यात आणि सर्वाधिक संसर्ग नागपूरमध्ये होता. कारण, पहिल्या लाटेत नागपूरच्या तुलनेत पुण्या-मुंबईत संसर्ग जास्त होता. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पुण्या-मुंबईपेक्षा नागपूरमध्ये संसर्गाचा दर वाढल्याचे दिसले.

  • लॉकडाउन पूर्वीच येथे कमी झाले रुग्णसंख्या : पुणे, ठाणे, मुंबई

  • लॉकडाउनंतरही येथे वाढली रुग्णसंख्या : पुणे ग्रामीण, सातारा, नगर,

  • लॉकडाउनमुळे या भागातील रुग्णसंख्या झाली नियंत्रित : नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती

covid 19 vaccination

''पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या लॉकडाउनमध्येही वाढली. सातारा, नगर या भागातही हे चित्र कायम दिसते. पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठी होती. भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता भागातील लोकांना गेल्या वर्षीच्या तुलनेत संसर्ग कमी झाला. तसेच चित्र धारावीमध्येही दिसते. कारण, पहिल्या लाटेतून सामुहीक रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली होती.''
- निखिल टिकेकर, संशोधक

''धारावीमध्ये गेल्या लाटेत साडेतीनशे मृत्यू होते, या लाटेत ते प्रमाण ४० पर्यंत कमी झाले. याचा अर्थ एका भागात एकाच संसर्गजन्य रोगाच्या दोन मोठ्या लाटा येऊ शकत नाहीत.''
- प्रा. मिलिंद सोहनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT