Pune News
Pune News Esakal
पुणे

Pune News: सुट्टे पैसे मागण्याची झंझट गेली! PMPML मध्ये फोन पे, गुगल पे वरुन मिळतयं तिकीट

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) बस सेवेत आता काहीसा बदल करण्यात आला आहे. पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसमध्ये आजपासून कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. पीएमपीएमएल बसमध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे आता प्रवाशांना तिकीट काढता आहे. (Latest Marathi News)

आज (रविवारी) सकाळपासून पीएमपीएमएलची ऑनलाईन तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. UPI QR कोड स्कॅन करून तिकिटांचे पैसे आता देता येणार आहेत. आता पुणे शहरात प्रवास करताना कॅश ठेवावी लागणार नाही. गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अ‍ॅपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. पीएमपीत आजपासून कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली.

पुणे शहर बसमधील ऑनलाईन तिकीटासंदर्भातील चाचणी आधी घेण्यात आली होती. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आलेली. घेतलेली चाचणी यशस्वी झाली त्यानंतर आता शहरातील सर्वच बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर पीएमपीच्या तिकीट वाटमधील भ्रष्टाचार आता बंद होणार आहे. आज दुपारी कोथरूड आगारात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. प्रवाशांना तिकिटासाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे. वाहकाच्या ई-तिकीट मशीनमध्ये तिकीट रक्कमेचा क्यू आर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.(Latest Pune News)

आता पीएमपीमध्ये सुट्या पैशांवरुन प्रवाशी आणि कंडाक्टर यांच्यात अनेक वेळा वाद होताना दिसून येतात. आता ऑनलाईन तिकीट सुरु झाल्यामुळे हे वाद थांबण्याची शक्यता आहे. पुण्यात आता खिशात पैसे नसताना बसमधून प्रवास करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT