पुणे

कनेक्‍टिंग विमानांची गैरसोय झाल्यास प्रवासाचा वेळ वाढणार

सकाळवृत्तसेवा

पुणे ः येथील विमानतळावरील उड्डाणे रात्रीच्या वेळेस बंद केल्याने पुण्यातून सकाळीच लवकर इतर शहरात जाऊन येथील काम संपवून रात्री परत येणा-या आणि कनेक्‍टिंग विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खर्च आणि त्यासाठी लागणारा वेळ वाढू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

धावपट्टीच्या कामासाठी लोहगाव विमानतळावरील रात्रीची उड्डाणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाशाला रात्री पुण्यातून दुस-या ठिकाणी जायचे असेल तर त्याला आता तो प्रवास करता येणार नाही. त्याचा परिमाण पुढील नियोजनावर होवू शकतो.

या सर्व परिस्थितीचा विचार करता सकाळी आठ ऐवजी पहाटे पाचपासून धावपट्टी खुली करावी. त्यामुळे सकाळी लवकर प्रवास करणा-या आणि कनेक्‍टिंग विमानाने जाणा-यांना दिलासा मिळेल. तसेच पूर्ण क्षमतेने जेव्हा विमान सेवा सुरू होईल तेव्हा देखील कनेक्‍टिंग वेळेचा विचार करूनच विमानांचे नियोजन करावे, अशी मागणी ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे ऑफ पुणे'चे संचालक नीलेश भन्साळी यांनी केली आहे.

उड्डाण बंद असूनही बुकिंग सुरू ः
पुण्यात रात्री येणा-या-जाणा-या विमानांचे उड्डाण बंद असल्याची विमान कंपन्यांना कल्पना आहे. मात्र तरी देखील रात्री पुण्यात येणा-या किंवा जाणा-या विमानांचे बुकिंग घेतले जात आहे. या बाबत प्रवाशाला माहिती मिळाल्यानंतर बुकिंग रद्द करताना त्याचे पैसे प्रवाशाच्या खात्यात जमा होण्याऐवजी विमान कंपनी ग्राहकांच्या वॉलेटमध्ये हे पैसे जमा करते. त्यामुळे प्रवाशांचे पैसे अडकून पडतात. तर दुस-या कंपनीचे विमान तिकीट काढण्यासाठी पुन्हा पैसे मोजावे लागत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT