corona1 
पुणे

जुन्नर, इंदापूर, दौंड, वेल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातही कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. आजही जुन्नर, इंदापूर, दौंड, वेल्हे तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.  

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील ७० वर्षीय कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेचा उपचार सुरू असताना बुधवारू (ता. २२) पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनामुळे मृतांची संख्या दहा झाली आहे. तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या ३२२ झाली असून, १६५ जण बरे झाले आहेत. १४७ जण उपचार घेत असून, १० जणांचा मृत्यू झाला आहे. 

जुन्नर तालुक्यात गेल्या चोवीस तासात ओतूर, बारव, आळे, बेल्हे व जुन्नर येथे ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जुन्नर शहरातील कोरोना बधितांची संख्या आज एकने वाढून ४६ झाली आहे. १० रुग्ण बरे झाले आहेत, तर ३३ जण उपचार घेत आहेत. तिघांचा मृत्यू झाला आहे. लक्षणे नसलेल्या १२५ रुग्णांपैकी १०३ लेण्याद्री कोविड सेंटर येथे असून, इतर होम क्वारंटाइन आहेत. लक्षणे असलेले २२ जण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. 

वेल्हे : वेल्हे तालुक्यात १९ जुलै रोजी एका जिल्हा परिषद सदस्यास, तर दोन दिवसांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याला  कोरोनाची बाधा झाली असताना आज तालुक्यातील आणखी एका पदाधिकाऱ्यासह तालुक्यातील इतर नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुका प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आज तालुक्यातील वांजळे गावात ६ जणांना वांगणीवाडी गावातील २, दोपोडे व निगडे मोसे येथील प्रत्येकी एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली. तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या ८८ वर पोहचली असून, त्यातील ४२ जणांनी कोरोनावर मात केली असून, दोन जेष्ठांचा मृत्यू झाला असून, इतर ४४ रुग्ण अॅक्टीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.

दौंड  : दौंड तालुक्यात  बोरीभडक येथे दोन, खुटबाव व बोरीपार्धी येथे प्रत्येकी एक, अशा चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये तीन पुरूष व एका महिलेचा समावेश असून या बाधितांचे वयोमान २८ ते ५२ दरम्यान आहे. तालुक्यात एकूण ४१३ जणांना कोरोनाची बाधा झाली असली तरी उपचारानंतर तब्बल १७१ जण बरे देखील झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.

दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते २२ जुलै या कालावधीत ४१३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारानंतर त्यापैकी तब्बल १७१ जण बरे झाले आहेत. दौंड तालुक्यात सध्या एकूण २२९ बाधितांवर दौंड शहरातील दोन कोविड केअर सेंटर, स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील पुणे- सोलापूर महामार्गालतच्या शैक्षणिक संकुलातील कोविड केअर सेंटर आणि खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर, दौंड शहरातील वीसपेक्षा अधिक बाधितांवर त्यांच्या घरातच विलगीकरण करून उपचार केले जात आहेत. तालुक्यात २५ मे २० जुलै या कालावधीत दरम्यान एकूण १५ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे दौंड शहरातील योगेश्वरी (शालीमार चौक), महालक्ष्मी (दौंड- गोपाळवाडी रस्ता) व पिरॅमिड ( अहल्यादेवी सहकार चौक) हॅास्पिटल आणि केडगाव येथील मयुरेश्वर हॅास्पिटल अधिग्रहणाचे आदेश काढण्यात आले आहेत. सदर रूग्णालयातील आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसह अधिग्रहण करण्यासंबंधी आदेशात नमूद करण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्यांवरही आता या योजनांतर्गत या चार रूग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार केले जाणार आहेत.

इंदापूर : इंदापूर शहर व तालुक्यात आज एकूण पाच कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 117 झाली आहे. इंदापूर तालुक्यात सकाळी ४ जण कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर शहर ठाकरगल्लीतील ५५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. इंदापूर शहरात २, जंक्शन, पळसदेव व बावडा येथे १, अशा एकूण ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT