coronaa1.jpg 
पुणे

मुळशीकर, आता तुम्हीच तुमचे रक्षक...

धोंडीबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असून कंपनी कामगार व सोसायट्य़ांमधील रहिवाशांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. पिरंगुट परिसरातील बहुतांश कंपन्या सुरु झाल्या असून या कंपन्यांतील कामगार कोरोनाचे शिकार होत आहेत. याशिवाय मुळशी तालुक्यात अथवा अन्य ठिकाणी राहणारे परंतु फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कंपनी कामगार, फ्लॅटमधील रहिवाशी तसेच अन्य सर्वच नागरिकांनी आता स्वतःच 'मीच माझा रक्षक '  ही भूमिका पार पाडावी लागणार आहे.

तालुक्यात सुमारे साडेतीनशे छोट्या मोठ्या कंपन्या असून त्यापैकी सुमारे नव्वद टक्के कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांतील ऐंशी टक्क्यांहून अधिक कामगार हे सासवड, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून अथवा अन्य़ ठिकाणाहून ये जा करतात. काही कंपन्यांतील कामगार तर कंटेन्मेंट क्षेत्रातूनही येत असतात. कंपनी ते राहत्या घरापर्यंत रोज प्रवास करणाऱ्या या कामगारांमुळे कोरोनाचा प्रसार जास्त होऊ लागल्याचे कामगारांचेच म्हणणे आहे. काही कामगार पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे असून त्यांनी काही वेळा पिरंगुट ते स्वतःच्या जिल्ह्यातील मूळ गावी असणारे घर असा प्रवास केला आहे.

याशिवाय या कामगारांनी त्या त्या जिल्ह्यात लग्नसमारंभांनाही हजेरी लावली आहे. कोरोनाचा विचार करता पिरंगुट परिसरातील विविध कंपन्यांतील सुमारे बाराहून अधिक कामगारांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. कोरोनाबाधित कंपन्यांतील प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कामगारांना कोरोना झाला आहे, अशा बहुतांशी कामगारांनी लग्नाला हजेरी लावल्याचे निदर्शनास आलेले आहे. कंपन्यांनी कितीही काळजी घेतली तरी कामगारांनीच शिस्त पाळली नाही तर कोरोनाला निमंत्रण हे ठरलेले आहेच.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबत व्हल्कन कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख रवींद्र घेवडे म्हणाले, " आमच्या कंपनीत रोज मशिनच्या साह्याने कामगारांची ऑक्सिजन पातळी मोजली जाते. रोजच्या रोज तापमान मोजले जाते. मास्क, सॅनिटायझर आदींचा पुरेसा वापर केला जातो. याशिवाय सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केले जाते. याशिवाय निर्जंतुकीकरण केले जाते. "  ब्रिंटन कारपेट कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख सतीश करंजकर म्हणाले, कंपन्यांनी काळजी घेतलेली आहेच. परंतु अनेक कामगार लग्नाला हजेरी लावतात. त्यानंतर अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कामगारांनी स्वतःहून स्वतःची काळजी घेतली पाहिजे. "

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जे. बी. केमिकल्सचे मालक श्रीधर जोशी,  बॅाब्स्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापक तानाजी काळे, मुबिया कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मण कारभारी, बसवराज बिन्नी, अमोल निंबाळकर यांनीही याच स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT