corona
corona 
पुणे

जुन्नरमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज झालीये एवढी वाढ

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आज (ता. २७) नव्याने पाच जणांची वाढ झाली असल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे.

जुन्नर तालुक्यातील पारुंडे व आंबेगव्हाण येथे प्रत्येकी दोन, तर मांजरवाडी येथे एक नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या सोळा झाली आहे. यातील डिंगोरे येथील एक रुग्ण बरा झाला आहे,  अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर व निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.

जांभूळपट- धोलवड, सावरगाव, खिलारवाडी, मांजरवाडी, पारूंडे व आंबेगव्हाण ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून, येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, देखरेख पथके या गावांवर लक्ष ठेऊन आहेत.

संशयित रुग्णांची लेण्याद्री येथील कोविड केंद्रात हाय रिस्क व लो रिस्क अशी वर्गवारी करण्यात येत आहे. येथे रुग्णांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात येत असल्याने आता रुग्णांना स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे जाण्याची गरज राहिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT