Corona 
पुणे

दिलासादायक! पुण्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - सलग सात दिवस 50 पेक्षा जास्त कोरोनामुक्तांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे दाखल रुग्णांचे प्रमाण 79 वरून 65 टक्क्यांपर्यंत कमी झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

सहलीसाठी दुबई येथे गेलेल्या दांपत्याला कोरोनाचे निदान झाल्याने राज्यातील पहिले कोरोनाचे रुग्ण पुण्यात 9 मार्चले आढळले. चौदा दिवस उपचार करून त्यांना 25 मार्चला महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातून घरी सोडले. मात्र, त्यानंतर नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी होते. पण, गेल्या नऊ दिवसांमध्ये शहरातील हा ट्रेंड बदलल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने टिपले आहे.

उतरता ट्रेंड
पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचा नवीन ट्रेंड आता दिसत आहे. एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 28 एप्रिलला एक हजार 339 होती. त्यापैकी एक हजार 57 (79 टक्के) प्रत्यक्ष उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल होते. हेच प्रमाण आता 65 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. म्हणजे, शहरातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा दोन हजार 29 दिसत असला तरीही त्यापैकी एक हजार 324 रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण 79 वरून 65 पर्यंत कमी झाले आहे. 

नऊ दिवसांमध्ये ३१३ कोरोनामुक्त
पुण्यात गेल्या नऊ दिवसांमध्ये 812 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले. पण, त्याच वेळी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 411 होती. त्यामुळे गेल्या नऊ दिवसांमध्ये आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 61 टक्के रुग्ण घरी गेले. एक मेपासून सलग सात दिवस पन्नासहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात 25 मार्च ते 6 मे या 43 दिवसांमध्ये 587 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एप्रिल अखेरपर्यंत बरे होऊन घरी जाणाऱ्यांपेक्षा नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. ही स्थिती आता बदलत आहे.

कोरोनाच्या संसर्गाला रोखणे पुणेकरांच्या सतर्कतेमुळे शक्‍य होत आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींच्या वाढत्या संख्येमुळे दिलासा मिळत आहे. मात्र, यापुढचे काही दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर काळजी घ्यायची आहे. तसे झाल्यास नव्या लॉकडाउनची गरज भासणार नाही. 
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT