Pune PMC  sakal
पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाकवच योजनेला वाढ

कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रुग्णांशी प्रत्यक्ष संबंध येऊन महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनाही त्यांची लागण होत होती, त्यामध्ये प्रकृती गंभीर होऊन आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेसाठी (Corona virus inhibitor) कार्यरत असलेल्या महापालिकेच्या (Pune muncipal corporation) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा कवच योजनेला मुदतवाढ दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रुग्णांशी प्रत्यक्ष संबंध येऊन महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनाही त्यांची लागण होत होती, त्यामध्ये प्रकृती गंभीर होऊन आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. (Pune News)

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये विमा रक्कम म्हणून दिली जाते. केंद्र आणि राज्य सरकार या योजनेला जोपर्यंत मुदत देर्इल, तोपर्यंत किंवा भारतीय साथ रोग कायद्यानुसार जोपर्यंत साथ आटोक्यात आल्याची घोषणा सरकार करीत नाही, तोपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला दिली, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

प्रभू श्रीरामचंद्राचे शिल्प

आंबेगाव पठार येथे दीड एकर जागेत प्रभू रामचंद्राचे शिल्प उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला आहे. लोकांच्या हृदयात श्रीराम आणि त्यांच्या जीवनमूल्यांची जोपासना व्हावी, या उद्देशाने शिल्प निर्मिती करणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघटनांनी हे शिल्प उभारावे अशी मागणी केली होती, असे हेमंत रासने यांनी सांगितले. हा प्रस्ताव नगरसेविका वर्षा तापकीर यांनी दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT