पुणे

ढगाळ वातावरण व पावसामुळे द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ

रवींद्र पाटे

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात मागील तीन दिवस ढगाळ वातावरण असून आज दुपारी पाऊस झाला. या मुळे अपेक्षित घड निर्मिती न झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. मागील दोन वर्षा पासून सुरू असलेले प्रतिकुल हवामानाचे संकट पाठ सोडत नसल्याने द्राक्ष उत्पादकासह भाजीपाला उत्पादक शेतकरी दृष्ट चक्रात सापडले आहेत. 

तालुक्यातील मध्य बागायतील भागात १३ मे २०२० रोजी गारपीट व मुसळधार पाऊस झाला. त्या नंतर तीन जून रोजी निसर्ग चक्रीवादळ झाले.सप्टेंबर  महिन्यात अतिवृष्टी झाली. यामूळे जुन्नर तालुक्यातील टोमॅटो, आंबा, भात, सोयाबीन या प्रमुख पिकासह भाजीपाला पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

नुकसानीचे पंचनामे झाले मात्र येडगाव भागातील शेतकऱ्यांना अजून नुकसानभरपाई मिळाली नाही.चक्रीवादळ व अतिवृष्टी याचा एकूणच परिणाम झाल्याने  तालुक्यात ऑक्टोबर छाटणी झालेल्या वीस टक्के बागेत घड निर्मितीच झाली नाही.तर सत्तर टक्के बागेतील वेलीवर सरासरी आठ ते दहा लहान आकाराचे घड  निर्मिती झाली आहे.संप्रेरकाचा वापर करून लहान आकाराचे घड सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. या वर्षी  किमान भांडवली खर्च  कसा वसूल होईल या साठी द्राक्ष उत्पादक कुटुंब रात्र दिवस मेहनत करून बागेची मशागत करत आहेत. मात्र तालुक्यात मागील तीन दिवस ढगाळ वातावरण असून आज दुपारी  पाऊस झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. प्रतिकूल हवामानाचे दृष्टचक्र पाठ सोडत नसल्याने द्राक्ष उत्पादकासह भाजीपाला उत्पादक हवालदिल झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. अटीत बसून देखील पीक विमा कंपनीने २०१७/१८ची नुकसान भरपाई दिली नाही.बँकांचे कर्ज वाढत आहे. कोरोनाचे संकट असल्याने मजूर मिळत नाहीत, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.दमट हवामानामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणी खर्च वाढला आहे. प्रतिकूल परिस्थितीत उत्पादीत केलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही.तालुका शेती प्रधान असल्याने शेती उत्पादनावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. एकूणच तालुक्यातील बळीराजा आर्थिक चक्रात गुरफटला आहे.-अनिल मेहेर, अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव

 निसर्ग चक्रीय वादळाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. कृषि विभागाने द्राक्ष बागांचे पंचनामे न केल्याने नुकसान भरपाई पासून द्राक्ष उत्पादक वंचित राहिले आहेत. राज्यातील द्राक्ष बागा  वाचवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने द्राक्ष बागांसाठी तातडीने विशेष पॅकेज जाहीर करावे.-हरिभाऊ वायकर, उपाध्यक्ष तालुका द्राक्ष उत्पादक संघ 

दृश्य स्वरूपात नुकसान झाले नसल्याचे कारण सांगून कृषी व महसूल विभागाने द्राक्ष नुकसानीचे पंचनामे केले नाहीत.ही चूक कृषी व महसूल विभागाने मान्य केली आहे. द्राक्ष उत्पादकांना पॅकेज अथवा नुकसानभरपाई मिळावी यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे.या बाबत मी व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे-अतुल बेनके, आमदार

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT