ghorpadi.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' भागात कालव्याजवळील जागेवर वाढले अतिक्रमण

सकाळवृत्तसेवा

घोरपडी (पुणे) : लॉकडाऊनचा फायदा घेऊन शिंदे वस्ती जवळ मुठा उजवा कालव्यानजिक मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढले आहेत. जलसंपदा विभागाच्या जागेवर आणि येथील खासगी जागेवर ही या काळात अनेक झोपड्या आणि पत्र्याचे शेड बांधले आहेत. परिसरातील काही स्थानिक गुंड जलसंपदा विभागाच्या जागेवर ताबा मिळवत असून येथील झोपड्या भाड्याने किंवा त्याची विक्री करत आहेत. तसेच परिसरात पत्र्याचे शेड उभारून विविध कामासाठी भाड्याने देत आहेत.

लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार बंद पडले होते. या काळात स्थानिक जागेचे मालक आणि इतर अधिकारी तिकडे फिरकले नसल्यामुळे या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर या परिसरात अतिक्रमण केले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर जागेचे मालक येथे पोहचल्यावर मात्र येथील परिस्थिती लक्षात आली. यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण  विभागात तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिस व प्रशासन कोरोनाच्या बंदोबस्तात असल्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत आहे. यामुळे परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोन वर्षांपूर्वी जनता वसाहत येथील कालवा फुटल्यानंतर जलसंपदा विभागाच्या जागांवरील अतिक्रमणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये पर्वती, जनता वसाहत, भीमनगर, शिंदे वस्ती, हडपसर औद्योगिक वसाहत, मगरपट्टा, साडेसतरा नळी या भागात कालव्याच्या जागेत अतिक्रमणे झाल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे.

 

लॉकडाऊनचा फायदा घेऊन स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आम्ही कुळाने वाहत असलेल्या जागेवर अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात पोलिस व महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. परंतु, कोरोनामुळे कारवाईस विलंब होत असल्याने स्थानिक गुंड रोज नवीन शेड उभारून आमच्या जागेवर ताबा मिळवत आहेत. गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने आम्हाला जागेवर येण्यास मज्जाव करत असून सरकारने आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा आहे.

- भानुदास कवडे , जागा मालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT