Increased migration during the lockdown period 
पुणे

लॉकडाऊन काळात वाढलं स्थलांतराचं प्रमाण; अनेक कुटुंबांनी सोडलं घर

सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा

महर्षीनगर(पुणे) : प्रत्येकाचं आपलं स्वतःच घर असावं हे स्वप्न असतं, यासाठी आयुष्याची पुंजी जमा करून हे स्वप्न सत्यात उतरताना पाहायचं असतं यात एक सुखद अनुभव , समाधान असतं. लॉकडाऊन काळात गुलटेकडी, मीनाताई ठाकरे वसाहत, डायस प्लॉट झोपडपट्टी भागातील अनेक कुटुंबांनी आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला, कोणी भाड्याच्या घरात गेले तर, कोणी स्वतःच्या हक्काच्या फ्लॅटचा ताबा मिळवला. यातील बहुतांश जणांनी आरोग्य प्रमाणपत्र घेऊन स्थलांतर केली असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. गुलटेकडी परिसर भागातील काही नागरिकांशी संवाद साधला तेव्हा माहिती मिळाली की, या लॉकडाऊन काळात अनेक कुटूंबाची घर प्रवेश समस्या निर्माण झाली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डायस प्लॉट मधील रहिवासी नरसिंह गायकवाड यांना पंचवीस मार्च रोजी गुढीपाडवा मुहूर्ताला आपल्या फ्लॅटचा ताबा मिळणार होता परंतु त्यापूर्वीच लॉकडाऊन झाल्याने ताबा मिळण्याची प्रक्रिया रखडली. सहा बाय आठच्या रूममध्ये पंधराहुन अधिक वर्षे झोपडपट्टी भागात काढल्यानंतर फुरसुंगीच्या फ्लॅटवर जाताना गायकवाड कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. परिसरातील अनेक कुटुंबे बदलती जीवनशैली स्वीकारत बाहेर राहण्याच्या मानसिकतेत आहेत.
 

सार्वजनिक कारणे

सार्वजनिक शौचालयाची असणारी असुविधा, सततची न होणारी चेंबर दुरुस्ती, सार्वजनिक आरोग्याचा गहन प्रश्न, पाणी प्रश्न, कचऱ्याचा गंभीर प्रश्न या सर्व प्रश्नाकडे स्थानिक प्रतिनिधीचं होणार दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये आता स्थलांतराची मानसिकता रुजविण्यास मदत होत आहे. तसेच भाडेतत्वावर राहण्यासाठी वेगाने विस्तार होणाऱ्या उपनगरांकडे वाटचाल केली, यात हडपसर, फुरसुंगी, काळेपडळ, अप्पर, सुखसागरनगर, काकडेनगर, गोकुळनगर, कात्रज, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी यासारख्या परिसरांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अरे देवा! पुणे महापालिकेचा आरोग्य विभागच पडला आजारी
 

सामाजिक कारणे

विवाह, कुटुंब नियोजनासाठी पडणारी अपूरी जागा, परिसरातील वाढती गुन्हेगारी, दाट लोकसंख्या, दररोज होणारी तंटा, भांडणे यामुळे मोठ्या प्रमाणात कुटूंबीय बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : मुंबई पोलिसांनी मागवली आंदोलनाची माहिती, जरांगे पाटील काय निर्णय घेणार?

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT