corona
corona 
पुणे

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या परिसरात वाढलाय कोरोनाचा धोका

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व परिसरातील चार जणांचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी दोन रुग्ण नारायणगाव शहरातील, धनगरवाडी व धालेवाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दहा झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत असलेल्या मांजरवाडी येथे २५ मे रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. ही महिला मुंबई येथून आली होती. प्रशासनाला माहिती न देता  मुंबई येथून धनगरवाडी येथे  वास्तव्यास आलेला तरुण २५ जून रोजी कोरोनाबाधित आढळुन आला होता. या प्रकरणी कोरोनाबाधित तरुण व त्याला आश्रय देणारी धनगरवाडी येथील व्यक्तीवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली  होती. त्यापैकी धनगरवाडी येथील एक व्यक्ती आज कोरोनाबाधित आढळून आली. 

नारायणगाव येथील टोमॅटो उपबजारात लेखनीक म्हणून काम करणारा वारुळवाडी येथील एक जण २८ जून रोजी कोरोनाबाधित आढळून आला. जून अखेरपर्यंत सुमारे चार महिने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास नारायणगाव ग्रामपंचायतीला यश आले होते. मात्र, तीन जुलै रोजी नारायणगाव शहरातील एक तरुण व एक महिला कोरोनाबाधित आढळून आले. त्यानंतर कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेले दोन तरुण व कोरोनाबाधित महिलेचा पती यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत  नारायणगाव शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाच झाली आहे.

नारायणगाव व परिसरात कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढला आहे. नारायणगाव व वारुळवाडी परिसर कंटेंनमेंट ( प्रतिबंधित) झोन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून ग्रामस्थ व व्यापारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन सरपंच योगेश पाटे व उपसरपंच सचिन वारुळे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT