Swati Khartode Sakal
पुणे

गाईच्या खरवसातून वाढते प्रतिकारशक्ती

कोरोना रुग्णाला गाईचा चीक (खरवस) आहार म्हणून दिल्यास त्यातील इम्युनोग्लोब्युलिनमुळे रोग प्रतिकारशक्ती (पॅसीव इम्युनिटी) वाढण्यास मदत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्णाला गाईचा चीक (खरवस) आहार म्हणून दिल्यास त्यातील इम्युनोग्लोब्युलिनमुळे रोग प्रतिकारशक्ती (पॅसीव इम्युनिटी) वाढण्यास मदत होते. पर्यायाने रुग्ण लवकर बरा होतो, असा दावा वैद्यकीय आहारातज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी केला आहे.

‘जर्नल ऑफ रिसर्च इन मेडिकल ॲण्ड डेंटल सायन्सेस’ या शोधपत्रिकेत याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. डॉ. खारतोडे यांनी २०० रुग्णांवर केलेल्या तुलनात्मक अध्ययनातून ही बाब समोर आली. पुण्यातील विश्र्वराज रूग्णालयात दाखल कोरोनाबाधितांवर त्यांनी ही चाचणी केली. त्या म्हणाल्या,‘‘ज्या गटाला गाईच्या चिकाचे सप्लिमेंट दिलेले होते. त्यांच्यामध्ये लवकर बरे होण्याचे प्रमाण दिसून आले. त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस दुसरा ते तिसरा होता आणि जे कंट्रोल ग्रुपमध्ये होते, ज्यांना सप्लिमेंट दिले नव्हते, त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस सहावा ते आठवा होता.’’

कोणता चीक खावा?

गाईचा चीक शुद्ध स्वरूपात (खरवस) मिळत असेल, तर तो नक्की खावा किंवा त्यापासून बनविलेले सप्लिमेंट खावे. फक्त ते ‘फ्रोझन ड्राइड किंवा फ्रीझ ड्रायिंग’ या पद्धतीनुसार बनवलेले असले पाहिजे, म्हणजे त्यामधील इम्म्युनोग्लोब्युलिनचा नाश होत नाही.

कोरोनासाठी हा उपचार नसून एक पोषक पूरक आहार आहे. प्रयोगादरम्यान ज्यांनी चीक खाल्ले त्या रुग्णांना बाहेरून मास्कद्वारे दिला जाणारा ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात आणि कमी दिवस लागला. याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर दिसून येत नाहीत, पण ज्यांना दुधाची अ‍ॅलर्जी असते त्यांनी मात्र हा चीक खाऊ नये.

- डॉ. स्वाती खारतोडे, संशोधक व वैद्यकीय आहार तज्ज्ञ

चिकातील पौष्टिक द्रव्यांचा परिणाम

विषाणूंचा संसर्ग झाल्यावर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी त्या विषाणूला नष्ट करण्यासाठी प्रतिपिंडे किंवा इम्युनोग्लोब्युलिन तयार करतात.

गाईच्या चिकामध्ये रोगप्रतिकाशक्ती किंवा इम्युनोग्लोब्युलिन भरपूर प्रमाणात असते.

त्यामुळे आपल्याला रोग प्रतिकारशक्ती (पॅसिव इम्युनिटी) मिळते.

संशोधनाचा फायदा

चिकामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, पर्यायाने कोरोना उपचाराला फायदा होतो

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठीचा उपयोग होतो.

कोरोना काळातील पौष्टिक आहार म्हणून वापर शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT