Increasing demand for working space in pune 
पुणे

ऑफिस परवडेना; को-वर्किंग स्पेसची वाढतेय डिमांड

सनील गाडेकर

पुणे : उद्योग-व्यवसायावर परिणाम झाल्याने खर्च कमी करण्यासाठी सध्या अनेक उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक उद्योजकांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आणि कंपनीच्या आर्थिक फायद्यासाठी कामगारांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या एकत्रित काम करणार्‍याच्या ठिकाणांमध्ये (को-वर्किंग) वाढ होऊ लागली आहे. 
काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसत आहे. स्टार्टअप देखील याची झळ सोसत आहे. त्यामुळे भाड्याने किंवा स्वतःचे ऑफिस घेऊन तेथून कंपनी चालवणे अनेकांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे को-वर्किंग स्पेसच्या माध्यमातून कमी पैशात कामगारांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. तर घरी काम करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करता कर्मचारी देखील को-वर्किंगच्या ठिकाणी जाऊन काम करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे अशा जागांचा शोध आता वाढू लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कार्यालयांच्या कमी उपलब्धतेमुळे संयुक्तरित्या वापरण्याच्या जागांमध्ये मोठी मागणी निर्माण होऊ लागली आहे. हा प्रवाह पुण्यातही कायम असून एकत्र काम करण्याच्या क्षेत्रात 2020 च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्ये 38 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यात स्टार्टअप आणि एसएमईचा वाटा सर्वात मोठा आहे, असे 'नाईट फ्रॅंक' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

काय असते को-वर्किंग स्पेस :
को- वर्किंगच्या संकल्पनेत एकाच मोठ्या कार्यालयात अनेक कंपन्यांना किंवा नोकरदारांना टेबल किंवा छोटे ऑफिस भाड्याने देण्यात येते. अशी सुविधा पुरवणारे व ती वापरणारे यांच्यात त्याबाबत ठराविक काळासाठी करार होतो. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांचे काम सुरू असते. या ठिकाणी काम करणाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना सुविधा पुरविण्यात येतात. 

घरून काम करण्यात येणाऱ्या मर्यादा दूर :
सध्या मोठ्या प्रमाणात नोकरदारांचे घरूनच काम सुरू आहे. मात्र जागेची पुरेशी उपलब्धता नसणे, काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा व वातावरण नसेल तर नोकरदार स्वतःहून को-वर्किंग स्पेसमध्ये टेबल भाडेतत्त्वावर घेऊन तेथे काम करत आहे. 

हद्द झाली! पतंग उडविण्यास विरोध केल्याने 'त्या' तिघांनी काय केलं पाहा​

या क्षेत्रात झाली को-वर्किंगमध्ये वाढ
क्षेत्र                                 वाढलेली टक्केवारी 

1) टेलिकॉम, ई-कॉमर्स,
सल्ला देणाऱ्या संस्था              17%

2) आयटी                            38%

स्रोत : नाईट फ्रॅंकने केलेला सर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT