पुणे : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत देशाचे संरक्षण क्षेत्र स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आता विस्तारत आहे. स्वदेशी संरक्षण सामग्रीच्या निर्मितीबरोबरच संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या संरक्षण उत्पादन विभागाच्या (डीडीपी) वतीने या सामग्रीच्या निर्यातीत ही भर देण्यात येत आहे. जगभरातील विविध देशांकडून भारतीय संरक्षण सामग्रीला मागणी देखील चांगली आहे. (Pune News)
संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी डीडीपीने काही विशिष्ट संरक्षण सामग्रीची यादी तयार केली आहे. तसेच आयुध निर्माण कारखाने (ओएफबी), डीपीएसयू व खासगी उद्योगांच्या सह्याने उत्पादन वाढविण्यासाठी विविध धोरणे, प्रकल्प आणि योजना राबविण्यात येत आहेत. सध्या आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन येथील सुमारे 75 देशांमध्ये संरक्षण सामग्रीची निर्यात केली जात आहे, अशी माहिती नुकतीच लोकसभेत रिता बी जोशी यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली.
डीडीपीतर्फे काही ठराविक संरक्षण सामग्रीच्या निर्यातीसाठी अधिकृतता जारी केली आहे. यामध्ये विशेष रसायने, टिअर गॅस लॉंचर, टॉरपीडो लोडिंग यंत्रणा, अलार्म मॉनिटरिंग आणि कंट्रोल, अंधारात काम करणारी दुर्बीण, फायर कंट्रोल सिस्टीम, शस्त्र शोधणारे रडार, लष्करी वाहने, रडार आदींचा समावेश आहे.
"खासगी उद्योगांना संरक्षण क्षेत्राशी जोडल्यामुळे आज भारताचा आयात सुमारे 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे आयातीचा वाचलेला खर्च सरकारद्वारे देशात डॅम, रस्ते, विजेचे खांब अश्या सुविधा पुरविण्यासाठी केला जाऊ शकतो. तर दुसरीकडे संरक्षण सामग्रीची निर्मितीसाठी होणारा खर्च हा निर्यातीच्या माध्यमातून मिळवण्यावर भर दिला जात आहे. तर सध्या स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत असल्याने या तंत्रज्ञानाचे सातत्याने आधुनिकीकरण करणे सोपे झाले आहे."
- कमोडोर (निवृत्त) एस एल देशमुख, संरक्षण विश्लेषक
बुलेट्स
- स्वदेशीकरण आणि एमएसएमई व स्टार्टअप्सला संधी देणे
- आयातीच्या खर्चात बचत
- गुंतवणूक प्रोत्साहन, थेट परकीय गुंतवणूक, आणि ‘इझ आँफ डुईंग बिझनेस’
- नवनिर्मिती, संशोधन आणि विकास
- निर्यातीमुळे देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ
गेल्या सात वर्षांतील संरक्षण उत्पादन विभागाने जारी केलेल्या निर्यात अधिकृतता किंमत
वर्ष : निर्यात अधिकृतता किंमत (कोटींमध्ये)
2014-15 : 1940
2015 - 16 : 2059
2016 - 17 : 1521
2017 - 18 : 4682
2018 - 19 : 10745
2019 - 20 : 9115
2020 - 21 : 8434
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.