Crime on without mask people Sakal
पुणे

पुण्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे मास्कची कारवाई होणार अधिक कडक

आत्तापर्यंत संथपणे सुरु असलेली पोलिसांची मास्कची कारवाई बुधवारपासून पुन्हा एकदा वेगात सुरु होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

आत्तापर्यंत संथपणे सुरु असलेली पोलिसांची मास्कची कारवाई बुधवारपासून पुन्हा एकदा वेगात सुरु होणार आहे.

पुणे - शहरात कोरोना रुग्णसंख्या (Corona Patients) मंगळवारी अचानक वाढल्यामुळे पोलिस (Police) प्रशासनही सतर्क (Alert) झाले आहे. आत्तापर्यंत संथपणे सुरु असलेली पोलिसांची मास्कची (Mask) कारवाई (Crime) बुधवारपासून (Wednesday) पुन्हा एकदा वेगात सुरु होणार आहे. "नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे, कारवाई करण्याची वेळ येउ देऊ नये" असा इशारा पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिला आहे.

शहरातील कोरोना रुग्ण संख्या मंगळवारी वाढली. त्यामुळे आरोग्य व्यवस्था व पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडुन मास्कची कारवाई वेगाने सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार, हि कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिस सहआयुक्त डॉ.शिसवे म्हणाले, "मागील आठ दिवसात शहरात कोरोना रुग्णाची संख्या 80 वरुन अकराशेच्यावर गेली आहे, त्यामुळे सर्व नागरीकांनी संभाव्य सकंटाचा बोध घेण्याची गरज आहे. पुणेकरांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये अंतर ठेवून वावरणे आणि हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे"

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केलाच पाहिजे, मास्क न घालऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. बुधवारपासून मास्कची कारवाई कडक केली जाईल, त्यादृष्टिने नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असा इशाराही डॉ.शिसवे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

बाबो! प्राजक्ता माळीनं गोरेगावमधील फ्लॅट तब्बल 'इतक्या' कोटींना विकला; व्यवहारामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात!

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक संथ

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

SCROLL FOR NEXT