Accident Sakal
पुणे

ट्रॅक्टरने दिली पाठीमागून धडक; अपघातामध्ये पती-पत्नीचा मृत्यू

वालचंदनगर हुन जंक्शनकडे परतत असताना जंक्शन जवळील नऊदारे येथे देवीच्या मंदिरासमोर ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : जंक्शन (ता.इंदापूर) जवळ जंक्शन-वालचंदनगर रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॉलीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

या अपघातामध्ये घन:शाम देवकीनंदन भाटीया (वय ५३ ) व आशा घन:शाम भाटीया ( वय ४६) वर्ष या पती-पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी यतीन राजकुमार भाटीया वय (३५) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आज मंगळवार (ता.४) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भाटिया हे वालचंदनगर गेले होते.

वालचंदनगर हुन जंक्शनकडे परतत असताना जंक्शन जवळील नऊदारे येथे देवीच्या मंदिरासमोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर -ट्रॉलीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT