पशुसंवर्धन Sakal
पुणे

इंदापूर : पशुसंवर्धनच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे अवाहन

जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : पशूसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ साठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना तसेच जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्रपशुपालक,शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑन लाईन पध्दतीने अर्ज भरण्यास दि.४ डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली असून दि.१८ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट व पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ.रामचंद्र शिंदे यांनी केले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

डॉ. शिंदे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून त्यांना शाश्वत अर्थाजन करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विविध योजना तसेच उपक्रमांद्वारे प्रयत्न करत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजने मध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पध्दतीनेअर्ज मागवून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यामध्ये अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यास दर वर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये म्हणून तयार प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार लाभार्थी हिस्सा व अन्य बाबींसाठी नियोजन करणे शक्य होणारआहे.

नावीण्यपूर्ण राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय योजनें अंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे,शेळी, मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थ सहाय्य देणे, शंभर कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल.

पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळीपालना पैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा,अर्ज व योजनां चीमाहितीhttps://ahd.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईल वर AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअरवर ४ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीतउपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक किंवा तालुका पशुधनविकास अधिकारी (विस्तार ) ,पंचायत समिती,जिल्हा पशुसंवर्धनअधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT